महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३ जानेवारी । यंदाच्या सिझनच्या रत्नागिरी हापूस आंब्याची पुण्यातील पहिली पेटी ही देसाई बंधू यांच्याकडे दाखल झाली आहे. 4 डझन रत्नागिरीच्या हापूस आंबा तब्बल 15 हजार रुपयात विक्री करण्यात आला आहे.दरवर्षी मकरसंक्रात नंतर रत्नागिरीतील हापूस हा बाजारात येत असतो.पण यंदा वातावरणीय बदलामुळे हा आंबा यंदा लवकर बाजारात दाखल झाला आहे.