पॉझिटिव्हिटी रेट जास्त असणाऱ्या राज्यांनी लॉकडाऊनबाबत निर्णय घ्यावा – केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३ जानेवारी । मागील महिन्यापासून ओमीक्रॉनबाबत (Omicron) केंद्राने सर्व राज्यांना गाईडलाईन्स दिल्या आहेत. मात्र ओमिक्रॉनचा संसर्ग झपाट्याने वाढत असून ज्या ठिकाणी केसेस वाढतायत, तिथे केंद्राचं पथकं मदत करत आहेत. ओमिक्रॉनेबाबत सर्वांनी सतर्क राहण्याची गरज, सर्वांनी नियमांचं पालन करावं जिनोम सिक्वेन्सिंग लॅब वाढवण्याचा केंद्राचा प्रयत्न आहे मात्र जिथे पॉझिटिव्हिटी रेट जास्त, तिथे लॉकडाऊन अथवा निर्बंध, कंटेन्मेंट झोनबाबत राज्यांनी ताबडतोब निर्णय घ्यावे लागतील असं महत्वाचं विधान केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी आज नाशिक येथे केलं आहे.

जिथे रूग्णसंख्या वाढतेय, तिथे ऑक्सिजन, बेड्सची उपलब्धता आणि अन्य आरोग्य सुविधांचा विचार करून राज्यांनी कठोर निर्बंधांबाबत निर्णय घ्यावा असा सल्ला देत 23 हजार कोटींचं पॅकेज केंद्राने दिलं, मात्र केवळ 17 टक्केच निधीचा वापर केला असल्याचही त्यांनी सांगितलं. ECR 2 पी पॅकेजमधील कामं संथ गतीनं, कामांना गती देण्याची गरज असल्याच मंत्री भारती पवार (Bharati Pawar) म्हणाल्या आहेत.

दरम्यान रुग्णसंख्या वाढली तर महाराष्ट्र सरकारही पश्चिम बंगालसारखा (West Bengal) कर्फ्यु लावण्याचा निर्णय घेऊ शकते केंद्राकडून सातत्याने राज्य सरकारला मदत मुंबईत सुपर स्प्रेडरसारखी परिस्थिती होऊ नये, यासाठी काळजी घेण्याची गरज असून सध्यातरी संपूर्ण देशात लगेचच लॉकडाऊन (Lockdown) लावण्यासारखी परिस्थिती नसल्याचही त्या यावेळी म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *