कोरोनामुळे सोन्याची झळाळी कमी.. वर्षभरात सोने ५१ हजारांवरून ४८ हजारांवर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३ जानेवारी । जळगाव : कोरोनामुळे २०२० मध्ये सर्वच व्यवसाय डबघाईला आले होते. सुवर्ण बाजार देखील कोलमडला होता. यामुळे २०२१ मध्ये वर्षभर सोन्याचा दर ५१ हजारांवरून ४८ हजार ५०० वर आले. दीड ते दोन हजारांची घट सोन्याच्या दरात झाली, कधी ४४ हजार, ४५ हजारांपर्यंत सोने खाली आले होते. असे असले तरी या काळात सोन्याला (Gold) प्रचंड मागणी वाढली असल्याचे सोने बाजारातील सोन्या-चांदीच्या विक्रीतून जाणवते. ७१ हजारांपर्यंत प्रतिकिलो गेलेले चांदीचे वर्षभरातील दर पाहता आठ ते दहा हजारांनी चांदीच्या दरातही घट झाली. (jalgaon news Gold price down last year corona impact)

जानेवारी २०२१ मध्ये सोन्याचा दर प्रतितोळा ५१ हजारांपर्यंत स्थिर झाले. नंतर मात्र कधी पाचशे, तर कधी हजारांनी घट झाली. गुढीपाडव्याला पुन्हा दरात वाढ झाली होती. विजयादशमी, दिवाळीला ४८ हजार ४०० रुपये प्रतितोळा असलेल्या सोन्याच्या दरात आठवडाभरात तेराशे रुपयांची दरवाढ नोंदविण्यात आली आहे. या दरवाढीला भारतीय बाजारात लग्नसराईसाठी होणारी वाढीव मागणी, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सोन्याच्या (Gold Market) दरात आलेली तेजी कारणीभूत ठरली. सराफा बाजारपेठेला दसरा, दिवाळी गेल्या दोन- तीन वर्षांतील सर्वाधिक उल्हासदायक गेला होता. दसरा, गुरुपुष्य अमृत योग त्यामागे धनत्रयोदशी व भाऊबीज या सर्वच सणांना मुहूर्ताची खरेदी मोठ्या प्रमाणावर झाली.

कोरोनामुळे (Corona) आलेली मरगळ अवघा १५ दिवसांत दूर होऊन सराफ बाजारात एकप्रकारचे नवचैतन्य आले. नंतर काही दिवसांत सोन्याच्या दरात मोठी घसरण झालेली होती. सोन्याचे दर ४७ हजार ९०० रुपयांपर्यंत खाली घसरून पुन्हा ४८ हजारांपर्यंत येऊन स्थिरावले होते. त्यात पुन्हा वाढ होऊन आज दर प्रतितोळा ५० हजार ९८५ झाले आहेत. चांदीच्या दरातही किलोमागे तब्बल एक हजारांची वाढ झाली आहे. तुलसी विवाहपासून लग्नसमारंभ सुरू झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सोन्या, चांदीच्या दागिन्यांना मागणी होत आहे. यामुळे सोन्याला झळाळी आली आहे. सोबतच चांदीच्या दरातही तेजी येऊ लागली आहे. वर्षभरातील सोने, चांदीच्या दराचे गणित पाहता मागणीत वाढ झाली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणी वाढली, की दरात वाढ होते आणि मागणी कमी झाली की दरही कमी होतात. असे असले तर २०२१ च्या जानेवारीतील ५१ हजारांचा टप्पा सोन्याने अद्याप ओलांडलेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *