आजपासून BlackBerry फोन होणार बंद

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ४ जानेवारी । जगातील सर्वात लोकप्रिय स्मार्टफोनबद्दल (Smartphones) बोलायचे झाल्यास जवळपास दशकभरापूर्वी बाजारात एक फोन आला होता, ज्याला लोक स्टेटस सिम्बॉल म्हणून बघायचे. .हे फोन ब्लॅकबेरी (BalckBerry) कंपनीचे होते, हा फोन पाहून तुम्हाला देखील तो विकत घ्यावा, असे वाटले असेल, आजही तुमच्याकडे ब्लॅकबेरी फोन असेल, तर त्या फोनला अखेरचा निरोप देण्याची वेळ आली आहे. कारण ब्लॅकबेरी आजपासून अधिकृतपणे काम करणे बंद करेल.

जगभरात Qwerty Keypad लोकप्रिय करणारे फोन आता यापुढे काम करणार नाहीत. 4 जानेवारीपासून, स्मार्टफोन सेवा देण्यात येणार नाहीत, म्हणजेच डिव्हाइसेसवर वायफाय कनेक्शन, डेटा, फोन कॉल्स, एसएमएस किंवा इमर्जेंसी कॉल करता येणार नाहीत

ब्लॅकबेरीने एका ब्लॉग पोस्टमध्ये सांगीतले की, ब्लॅकबेरी फोनची सेवा 4 जानेवारीपासून म्हणजेच आजपासून बंद करण्यात येईल. कंपनीने सांगितले की, BlackBerry 7.1 OS आणि त्यापूर्वीच्या, BlackBerry 10 सॉफ्टवेअर, BlackBerry PlayBook OS 2.1 आणि पूर्वीच्या व्हर्जन्ससाठी सेवा 4 जानेवारी 2022 नंतर बंंद होईल. वाय-फाय कनेक्‍शन द्वारे या सर्विसेस आणि सॉफ्टवेअर चालवणारी डिव्हाइसेस यापुढे डेटा, फोन कॉल, SMS आणि इमर्जंनसी क्रमांकांसाठी काम करणे बंद करतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *