Coronavirus: कोरोनाचा उद्रेक; कोरोना बादितांच्या संख्येत तब्बल 55.4 टक्क्यांनी वाढ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .५ जानेवारी । बुधवारी भारतात कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत भारतात कोरोना बादितांच्या संख्येत तब्बल 55.4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. देशभरात गेल्या 24 तासांत नोंद झालेल्या रुग्णांची संख्या 58,097 इतकी आहे. यामुळे देशभरातील एकूण बाधितांची संख्या आता 35,018,358 इतकी झाली आहे. तर भारतातील सक्रिय रुग्णांची संख्याही 2 लाखांहून अधिक झाली आहे. देशभरात सक्रिय रुग्णांची संख्या 2,14,004 इतकी आहे.

गेल्या 24 तासांत भारतात एकूण 15,389 कोरोना बाधितांनी कोविडवर मात केली आहे. देशभरात आतापर्यंत एकूण 34,321,803 नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे. भारतातील रुग्ण बरे होण्याच दर 98.01 टक्के इतका आहे.

मृत्यूच्या आकडेवारीबाबत बोलायचे झाले तर देशात गेल्या 24 तासांत 534 नागरिकांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. देशात आतापर्यंत एकूण 4,82,551 नागरिकांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

एका आठवड्यात दररोज सरासरी कोविड केसेसमध्ये 285 टक्के वाढ

23 डिसेंबर ते 29 डिसेंबर या कालावधीत एकूण नोंद झालेल्या कोविड बाधितांच्या तुलनेत 30 डिसेंबर ते 5 जानेवारी या कालावधीत नोंद झालेल्या कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ आहे. ही वाढ तब्बल 285 टक्के इतकी झाली आहे. 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर या कालावधीत एकूण 56,722 बाधितांची नोंद झाली होती. जी दैनंदिन सरासरी 8,103 इतकी होती. तर गेल्या सात दिवसांच्या आकडेवारीनुसार देशात एकूण 2,18,667 बाधितांची नोंद झाली आहे. ज्यानुसार दैनंदिन बाधितांची सरासरी संख्या 31,238 इतकी आहे म्हणजेच गेल्या आठवड्याच्या तुलनेत 285 टक्क्यांनी अधिक आहे.

मुंबईत कोरोनाचा उद्रेक

मुंबईत कोरोनाचा कहर सुरू झाला असून मंगळवारी (4 जानेवारी) नव्या 10 हजार 860 रुग्णांची झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होत असल्याचं चित्र आहे. या रुग्णांसह मुंबईत कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या एकूण रुग्णांची संख्या पोहोचली आहे 8 लाख 18 हजार 462 वर. गेल्या 24 तासांत मुंबईत 834 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे, तर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या एकूण रुग्णांची संख्या 4491 वर पोहोचली आहे.

महाराष्ट्रात ओमायक्रोनचे 75 नवे रुग्ण

राज्यात मंगळवारी (4 जानेवारी) दिवसभरात 75 नव्या ओमायक्रोनबाधितांची नोंद झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून याबाबत माहिती दिली आहे. विशेष म्हणजे या 75 रुग्णांपैकी 40 रुग्ण हे मुंबईतीलच आहेत. त्यापाठोपाठ ठाण्यातील 9, पुण्यातील 8, पनवेल 5, कोल्हापूर आणि नागपूरचे प्रत्येकी 3 रुग्णांचा समावेश आहे. या नव्या रुग्णांमुळे राज्यातील ओमायक्रोनबाधितांची 663 इतकी संख्या झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *