केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारीच्या पगारात मिळणार अधिकचे पैसे; जाणून घ्या कसे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .५ जानेवारी । केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्याच्या पगारात अधिकचे पैसे मिळण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारात जवळपास ४५०० रुपये अधिकचे मिळू शकतात. मात्र यासाठी कर्मचाऱ्यांना एक वाउचर भरून द्यावा लागेल. करोना संकटामुळे देशभरातील शाळा बंद होत्या. त्यामुळे कर्मचारी मुलांच्या शिक्षणाच्या भत्त्यासाठी अर्ज करू शकले नव्हते. याचा फायदा २५ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार आहे. दुसरीकडे, गेल्या १८ महिन्यांपासून अडकलेल्या महागाई भत्त्यावरही निर्णय होऊ शकतो. याचा थेट फायदा कर्मचाऱ्यांसह पेन्शनर्संना होणार आहे.

मुलांच्या शिक्षण भत्त्यासाठी अर्ज करा
केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना पगाराव्यतिरिक्त वेगवेगळे भत्ते देते. यात मुलांच्या शिक्षण भत्त्याचाही समावेश आहे. करोना संकटामुळे सरकराने कर्मचाऱ्यांना सूट दिली आहे. जर तुम्हीही मुलांच्या शिक्षण भत्त्यासाठी अर्ज करू शकला नसाल, तर जानेवारी महिन्यात यासाठी अर्ज करता येणार आहे. यासाठी कोणतीही कागदपत्रं सादर करण्याची आवश्यकता नाही. केंद्रीय कर्मचाऱ्यांना दोन मुलांसाठी शिक्षण भत्ता मिळतो. सातव्या वेतन आयोगानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना एका मुलाच्या शिक्षणासाठी २२५० रुपयांचा भत्ता मिळतो. दोन मुलांसाटी ४५०० रुपये मिळणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *