महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .५ जानेवारी । मुंबईसह जगभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिरातील श्रींच्या मूर्तीला बुधवार, 12 ते रविवार, 16 जानेवारी या कालावधीत शेंदूर लेपन करण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांना या कालावधीत प्रत्यक्षात श्रींच्या मूर्तीचे दर्शन घेता येणार नाही त्याऐवजी श्रींच्या प्रतिमेचे दर्शन दिले जाणार आहे. सोमवार, 17 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजल्यापासून नेहमीप्रमाणे गाभाऱ्यातून भाविकांना श्रींचे दर्शन घेता येईल, अशी माहिती श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या वतीने देण्यात आली आहे.