महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .६ जानेवारी । 17 नंबरचा अर्ज भरून दहावी-बारावीच्या परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या उमेदवारांना अतिविलंब शुल्कासह अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थी प्रतिदिन 20 रुपये विलंब शुल्क भरून 12 जानेवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात, अशी माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली. दहावीचे विद्यार्थी http://form17.mh-ssc.ac.in या तर बारावीचे विद्यार्थी http://form17.mh-ssc.ac.in या वेबसाईटवरून अर्ज भरू शकतात.