महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .६ जानेवारी । केंद्र सरकारने २०१४ मध्ये कोणत्याही शुल्काशिवाय (झिरो बॅलन्स) जन धन खाते उघडण्यास सुरुवात केली. ज्याद्वारे प्रत्येक वर्ग आणि ग्रामीण भागापर्यंत बँकिंग सुविधा पोहोचवण्याचा सरकारचा मानस होता. जर तुम्हीही जन धन खाते उघडले असेल, तर या खात्यातून तुम्हाला १० हजार रुपयांची ओव्हरड्राफ्ट मिळेल,जर तुम्हाला याचा फायदा घ्यायचा असेल, तर ही बातमी नक्की वाचा.
जन धन खात्याचे फायदे
गॅस सबसिडी, शिष्यवृत्ती, वृद्धापकाळात निवृत्ती वेतन, पीएम किसान सन्मान निधी यासह इतर योजनांचे पैसे सरकार पंतप्रधान जनधन खात्यातच जमा करते. यासोबतच हे खाते इतर बँकिंग सुविधांसाठीही वापरता येईल. दुसरीकडे, तुमच्या जन धन खात्यात शून्य शिल्लक असली तरीही तुम्ही १०,००० रुपयांपर्यंतचा ओव्हरड्राफ्ट घेऊ शकता.
कोणाला मिळतो ओव्हरड्राफ्ट?
ज्या लोकांचे जन धन खाते ६ महिने जुने आहे. ते सर्व लोक त्यांच्या खात्यावर १० हजार रुपयांचा ओव्हरड्राफ्ट घेऊ शकतात. तुम्हाला सांगतो की, पूर्वी ही रक्कम ५ हजार रुपये होती, पण सरकारने ती नुकतीच १०,००० रुपये केली आहे. तसेच महत्वाची गोष्ट म्हणजे ओव्हरड्राफ्ट सुविधेसाठी तुमचे वय ६५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
यांनाही मिळतो ओव्हरड्राफ्ट
तुमचे जन धन खाते ६ महिने जुने नसले तरीही तुम्ही ओव्हरड्राफ्टची सुविधा घेऊ शकता, पण तुम्हाला फक्त २००० रुपयांचा ओव्हरड्राफ्ट मिळेल.
जन धन खाते कसे उघडायचे?
कोणताही भारतीय नागरिक जन धन खाते मोफत उघडू शकतो. यामध्ये किमान शिल्लक ठेवण्याची गरज नाही. यासोबतच जन धन खात्यावर २ लाख रुपयांचा अपघाती विमाही उपलब्ध आहे. तसेच, जन धन खाते उघडण्यासाठी किमान वय १० वर्षे आहे आणि कोणतीही उच्च वयोमर्यादा नाही.