covid cases in india : एअर इंडियाच्या विमानात फुटला करोना ‘बॉम्ब’! १२५ प्रवासी पॉझिटिव्ह

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .६ जानेवारी । देशात गेल्या दिवसांपासून करोनाच्या रुग्णांची संख्या हजारोंच्या ( amritsar airport ) पटीने वाढत आहे. ओमिक्रॉनचा अनेकांना संसर्ग होत आहे. आता एअर इंडियाच्या इटली-अमृतसर फ्लाइटमध्ये जवळपास १२५ प्रवासी करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. सर्व प्रवासी अमृतसर विमानतळावर उतरले होते. याची माहिती विमानतळ संचालक व्ही. के. सेठ यांनी दिलीय.

अमृतसरच्या श्री गुरु रामदास आंतरराष्ट्रीय विमानतळावर इटलीहून निघालेले एअर इंडियाचे विमान उतरले. या विमानातील १२५ प्रवासी करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. विमानात एकूण १८० होते. करोना संसर्ग झालेल्या सर्व प्रवाशांना आयसोलेट करण्यात आलं आहे. त्यांचे नमुने घेऊन ते ओमिक्रॉनच्या तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. दुसरीकडे, अमृतसरचे पोलीस उपायुक्त गुरप्रीस सिंगही करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

पंजाबमध्ये गुरुवारी ओमिक्रॉनचे ४ नवीन रुग्ण आढळून आले होते. यासोबतच करोनाचा संसर्ग झालेल्या नवीन रुग्णांची संख्या १८११ इतकी होती. राज्यसभेचे खासदार सुखदेव सिंग ढिंडसा, माजी मंत्री मनोरंजन कालिया, अमृतसर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी गुरप्रीत सिंग खैहरा आणि महापालिकेचे आयुक्त संदीप रिषी, पतियाळाचे जिल्हाधिकारी संदीप हंस, एडीसी गुरप्रीत सिंग थिंद यांच्या अनेक प्रमुख अधिकाऱ्यांना करोनाचा संसर्ग झाल्याचं बुधवारी समोर आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *