महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .६ जानेवारी । मुंबईत कोरोनाचा प्रचंड उद्रेक बघायला मिळतोय. विशेष म्हणजे मुंबईत काल कोरोना रुग्णसंख्येने 15 हाजारांचा टप्पा पार केला होता. पण आज हाच आकडा थेट 20 हजारांच्या पार गेला आहे. त्यामुळे प्रशासनासह मुंबईकरांची धाकधूक वाढली आहे. विशेष म्हणजे मुंबईची प्रसिद्ध झोपडपट्टी असलेल्या धारावी परिसरात कोरोनाबाधितांचा आजचा आकडा थेट 100 च्या पार गेलेला आहे. त्यामुळे प्रशासनापुढील मोठे आव्हानं उभी राहिली आहेत. मुंबईत आज दिवसभरात तब्बल 20 हजार 181 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी 17 हजार 154 रुग्णांमध्ये सध्यातरी कोणतेही लक्षणे दिसत नाहीत. तर दिवसभरात 1 हजार 170 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईत आज दिवसभरात चार रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर 2 हजार 837 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईतील पॉझिटिव्ही दर हा थेट 30 टक्क्यांवर पोहोचला आहे. तसेच रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील प्रचंड प्रमाणात वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे लक्षणे नसलेल्या बाधितांची संख्या कालपर्यंत 87 टक्के होती, पण हीच आकडेवारी आज थेट 85 टक्क्यांच्या खाली गेली आहे. तसेच मुंबईतील एकूण बेड्सच्या आकडेवारीपैकी 16.8 बेड्स हे आज भरले आहेत. येत्या काळात रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर प्रशानापुढील आव्हानं आणखी वाढत जातील.