महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .७ जानेवारी । संपूर्ण महाराष्ट्रातील कोरोना रुग्णवाढीचा नवा विक्रम नव्या वर्षात नोंदवला आहे. तब्बल 36 हजारपेक्षा जास्त नवे कोरोना रुग्ण संपूर्ण राज्यात आज आढळून आले आहेत. यातील 20 हजारपेक्षा जास्त रुग्ण तर एकट्या मुंबईत आढळून आले आहेत.
महाराष्ट्रात (Maharashtra ) कोरोना (Corona) आणि ओमिक्रॉन (Omicron) वेरियंटचे रुग्ण वाढत असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रातील ओमिक्रॉन बाधितांच्या संख्येत आणखी 79 जणांची भर पडली. राज्यात आतापर्यंत 876 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 381 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 36265 वर गेला आहे. बुधवारी आलेल्या माहितीनुसार 24 तासात तब्बल36 हजार 265 रुग्ण कोरोना आढळून आले आहेत.
पिंपरी चिंचवड शहरातील वाढती रुग्णसंख्या पाहता नेहरुनगरातील जम्बो रूग्णालय पुन्हा सुरू होणार
-हे जम्बो रुग्णालय १५ जानेवारीपासून पुन्हा 800 बेडसह सुरू करण्यात येणार आहे. त्यामध्ये 609 बेड ऑक्सिजनयुक्त, 200 आयसीयू बेड उपलब्ध राहणार आहेत
– दोन महिन्यांसाठी एकूण १० कोटी खर्च येणार आहे
-पिंपरी चिंचवड शहरात गेल्या सहा दिवसात कोरोना संसर्गाचे प्रमाण सहापटीने वाढले त्यामुळे पॉझिटिव्ह दर सहा टक्के पेक्षा अधिक झालाय
-असं असलं तरी ह्यामध्ये गंभीर रुग्णाची संख्या नगण्य
-घरीच उपचारघेणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 75 टक्केपेक्षा अधिक आहे