रेल्वेचं कन्फर्म तिकिट मिळण्याचा उत्तम पर्याय, घर बसल्या करा बुक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .७ जानेवारी । रेल्वेच्या कन्फर्म तिकिटाकरता प्रत्येकजण प्रयत्नशील असतो. अनेकदा कन्फर्म तिकिट कसं बुक करावं असा अनेकांचा प्रश्न असतो. तात्काळ तिकिटाच्यावेळी हा प्रश्न खूप महत्वाचा असतो. अनेकदा रेल्वेचं तात्काळ तिकिट बुक करताना अधिकचा वेळ लागतो. पण तिकिट काही बुक होत नाही. ही समस्या अधिकतर सणासुदीच्या काळात दिसून येते. या समस्येवर मात करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही ट्रेनचे तिकीट लवकर काढू शकाल आणि स्टेशनवर लागणाऱ्या लांबलचक रांगा देखील टाळू शकाल. या टिप्ससह, तुम्ही प्रवासाच्या एक दिवस आधी तत्काळ तिकिटे सहजपणे बुक करू शकाल.  

सकाळी १० वाजल्यापासून एसी कोचसाठी तत्काळ आरक्षण सुरू होते. त्याच वेळी, नॉन-एसी तिकिटांचे बुकिंग सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होते. काही तत्काळ जागांवर आरक्षण करण्यासाठी हजारो लोक एकत्र प्रयत्न करतात.तिकीट बुक करताना, प्रवास तपशील भरण्यासाठी जास्तीत जास्त वेळ लागतो. प्रवाशांची संख्या जास्त असेल तर जास्त वेळ लागतो. वेबसाइटवरून तिकीट बुक करताना तुम्हाला कॅप्चा कोड देखील टाकावा लागेल. यातही वेळ लागतो आणि कन्फर्म तिकीट बुक करता येत नाही. शेवटी तुम्हाला प्रतीक्षा यादीतील तिकिटावर समाधान मानावे लागेल.

आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरच एक पर्याय उपलब्ध आहे, ज्याचा वापर करून तुम्ही तपशील भरण्याचा वेळ वाचवू शकता. IRCTC वेबसाइट आणि ऍप दोन्हीवर प्रवाशांचे तपशील आगाऊ सेव्ह करण्याचा पर्याय आहे. म्हणजेच हे फीचर समजून घेतल्यानंतर तुम्हाला प्रवाशांचे तपशील पुन्हा पुन्हा भरावे लागणार नाहीत.

तिकीट बुक करताना, तुमची ट्रेन आणि वर्ग निवडल्यानंतर, प्रवाशांचे तपशील भरताना, Add New वर क्लिक करण्याऐवजी, ADD Existing वर क्लिक करा. येथे तुम्हाला सेव्ह केलेले प्रवासी प्रोफाइल मिळेल. येथे तुम्ही प्रवाशांची नावे निवडू शकता. यानंतर, पत्ता तपशील भरल्यानंतर, तुम्ही पेमेंट मोडवर पोहोचाल. येथे तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा UPI द्वारे पैसे देऊन वेळ न घालवता तुमचे तिकीट बुक करू शकता.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *