आठवडाभरात पुण्यात तब्बल पंधरा हजार रुग्ण वाढले, दिवसभरात आढळले 4029 बाधित

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१० जानेवारी । मागील पंधरा ते वीस दिवसांपासून पुणे शहरात कोरोना रुग्णसंख्येत झपाटय़ाने वाढ होत असून, आठवडाभरातच शहरात तब्बल 14 हजार 864 बाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर दैनंदिन रुग्णसंख्या पाचशेवरून चार हजारांवर पोहोचली आहे.

पुणे शहरात आजपर्यंतची बाधित रुग्णांची संख्या पाच लाख 26 हजार 35 वर गेली आहे. सध्या शहरात एकूण 14 हजार 890 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. पुणे महापालिका क्षेत्रात विविध कोविड सेंटर, खासगी लॅब आणि रॅपिड ऍण्टिजेन किटद्वारे रविवारी (दि. 9) 18 हजार 12 जणांची कोरोनाची चाचणी करण्यात आली, यात 4 हजार 29 नव्या बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. 688 जण कोरोनातून बरे झाले आहेत, तर दिवसभरात तिघांचा मृत्यू झाला आहे. यात पुण्याबाहेरील दोघांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *