Maharashtra Corona Update: राज्यात ४४,३८८ नव्या रुग्णांची नोंद

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१० जानेवारी । राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे राज्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच कोरोनच्या नव्या ओमिक्रॉन (Omicron) या व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. राज्यात गेल्या २४ तासात ४४ हजार ३८८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तसेच १५ हजार ३५१ रुग्णा कोरोनमुक्त झाले आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण ६५,७२,४३२ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. सध्या राज्यातील राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.९८ टक्के आहे.

गेल्या २४ तासात १२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा २.०४ टक्के एवढा आहे. राज्यात १०,७६,९९६ व्यक्ती होम क्वारांटाईन असून २६१४ व्यक्ती संस्थात्मक क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात ओमिक्रॉनचे २०७ रुग्ण आढळून आले आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण १२१६ ओमिक्रॉन बाधित रुग्ण सापडले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *