मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपिटीची शक्यता – IMD

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१० जानेवारी । उत्तरेकडील पश्‍चिमी चक्रावात, अरबी समुद्रातून होत असलेला बाष्प पुरवठा त्याचबरोबर बंगालच्या उपसागरातून एकत्र येणारे वारे, यांच्या प्रभावामुळे पुढील चार दिवस मध्य आणि वायव्य भारतात (India) पावसाची शक्यता आहे. यामुळे राज्यातही पावसासाठी पोषक हवामान निर्माण झाले असून पुढील दोन दिवस विदर्भ (Vidarbha) आणि मराठवाड्यात (Marathwada) विजांच्या कडकडाटासह पाऊस तर काही भागात गारा पडण्याची शक्यता आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये गेल्या दोन दिवसात पावसाने हजेरी लावली तर विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट झाली. दरम्यान, सोमवारी मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारा पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. (Weather update maharashtra rain in marathwada imd)

उत्तरेकडील पश्चिम चक्रावात आणि अरबी समुद्रातून येणारी आर्द्रता यासह पुढील ४,५ दिवस अरबी व बंगालच्या उपसागरातून एकत्र येणारे वारे यामुळे पावसाची शक्यता आहे. 9 ते 13 जानेवारी या कालावधीत मध्य पूर्वेकडील राज्यांसह व मध्य भारतात हलका-मध्यम पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातही १० आणि ११ तारखेला मराठवाडा, विदर्भात पावसाची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *