बूस्टर डोससाठी असलेली नियमावली एका क्लिकवर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १० जानेवारी । बूस्टर डोस संदर्भातील महत्त्वाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी केली होती. त्यानुसार आरोग्य कर्मचारी तसेच फ्रंट लाइन वर्कर्स यांना आजपासून बूस्टर डोस देण्यास देखील सुरुवात होत आहे. सध्या देशभरात लसीकरण वेगाने सुरु आहे. सर्वांना लसीचे दोन डोस दिले जात आहेत. आज, 10 जानेवारीपासून आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर तसंच 60 वर्षांवरील नागरिकांना बूस्टर डोस देण्यात येणार आहे.

काय आहे बुस्टर डोससाठी नियमावली

भारतात कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेले आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर आणि विविध आजार असलेल्या 60 वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना 10 जानेवारीपासून लसीचा बुस्टर डोस देण्यात येणार आहे.
कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे कोरोना प्रतिबंधक लसीच्या बूस्टर डोससाठी नाहीत. राष्ट्रीय कोरोना लसीकरण कार्यक्रमाचे सध्याचे प्राधान्य संपूर्ण पात्र लोकांना दोन डोससह संपूर्ण लसीकरणाला असल्याचे केंद्राने सांगितले होते.
बुस्टर डोस देताना या आधी जी लस घेतली आहे, त्याच लशीचा बुस्टर डोस देण्यात येणार असल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे. कोव्हॅक्सिनची लस ज्या लोकांनी घेतली आहे, अशांना कोव्हॅक्सिनचाच बुस्टर डोस देण्यात येईल, तर ज्यांनी कोव्हिशिल्ड लस घेतली आहे, अशांना कोव्हिशिल्डचाच बुस्टर डोस देण्यात येईल.
आजपासून देशभरात बूस्टर डोस देण्यात येणार आहे. या बूस्टर डोससाठी CoWin वर नव्याने नोंदणी करण्याची कोणतीही आवश्यकता नसल्याचेही केंद्राने म्हटले आहे.
पात्र लोक ज्यामध्ये आरोग्यसेवा कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे व्याधी असलेल्यांचा समावेश आहेत, ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत, ते कोणत्याही लसीकरण केंद्रात जाऊन बूस्टर डोस घेऊ शकतात. हा बूस्टर डोस घेण्यासाठी कोविनवर स्लॉट बुक करणे गरेजेचे नाही. पण हे डोस कुठे मिळू शकतील याची माहिती कोविन अॅपवरच मिळू शकणार आहे. तिसऱा डोस घेतल्यानंतर, त्याची माहिती लसीकरणाच्या प्रमाणपत्रावरही दिसणार आहे.
अनेक व्याधींनी ज्या 60 वर्षावरील व्यक्ती ग्रस्त आहेत, त्यांनाच हा डोस देण्यात येणार आहे. केंद्र सरकारने या 22 व्याधींची यादी जाहीर केली आहे. हा डोस घेण्यासाठी डॉक्टरांकडून इतर कोणत्याही प्रमाणपत्राची गरज नसल्याचेही सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. पण डॉक्टरांच्या सल्ल्याने हा बूस्टर डोस घ्यावा, असेही सांगण्यात आले आहे.
ही लस आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर आणि विविध आजार असलेल्या 60 वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना सरकारी लसीकरण केंद्रांवर मोफत देण्यात येणार आहे. पण खासगी हॉस्पिटल्स आणि खासगी लसीकरण केंद्रांवर यासाठी पैसे मोजावे लागतील.
दोन डोस घेऊन ज्यांचे नऊ महिने म्हणजेच 39 आठवडे झाले आहेत, त्यांनाच हा तिसरा बूस्टर डोस घेता येणार आहे. संबंधित व्यक्तीचा हा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर, त्यांना कोविनकडून तिसरा डोस घेण्याबाबतचा मेसेजही येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *