महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १३ जानेवारी । पेट्रोल आणि डिझेलच्या (petrol and diesel)वाढत्या किंमतीपासून वाहन चालकांना गेल्या काही दिवसांपासून दिलासा मिळाला आहे. मात्र सीएनजी (CNG)वाहन वापरत असलेल्यांना बसत असलेला इंधन दरवाढीचा झटका अद्याप थांबलेला नाही. बुधवारी (ता. १३) सीएनजी दोन रुपये १० पैशांनी महागले आहे. त्यामुळे आता शहरात एक किलो सीएनजीसाठी ६६.०० रुपये मोजावे लागणार आहे.नोव्हेंबर २०२१ नंतर झालेली या वर्षातील ही पहिली दरवाढ आहे. त्यापूर्वी ऑगस्ट महिन्यात सीएनजी चार रुपये ६० पैशांनी महागला होता. चार आणि १४ ऑक्टोंबर रोजी अनुक्रमे दोन आणि २.६ रुपयांनी सीएनजीच्या दरात वाढ झाली होती .
एकदाच महिन्यात चार रुपयांनी दरवाढ झाल्याची ती पहिलीच घटना होती.दिवाळीत पेट्रोल पाच रुपयांनी आणि डिझेल दहा रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला होता. हा दिलासा अद्याप कायम असून त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले नाहीत. मात्र दिवाळीनंतर आता पुन्हा एकदा सीएनजीचे दर वाढले आहेत.
अशीच दरवाढ होत राहिली तर सीएनजीची किंमत पेट्रोल-डिझेल एवढी व्हायला वेळ लागणार नाही.