पुणे ,पिंपरी चिंचवड, मुंबई आणि नागपूरमध्ये काय सुरु, काय बंद, काय वगळलं

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ; ऑनलाईन ; पुणे : कोरोना विषाणूची साथ रोखण्यासाठी आणखी कठोर पावले उचलत राज्य सरकारने शुक्रवारी मध्यरात्रीपासून मुंबई महानगर क्षेत्रासह पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर ही महानगरे बंद केली. या महानगरांमधील सर्व दुकाने, आस्थापना, खासगी कार्यालये, हॉटेल्स, पानटपर्‍या, चहाच्या टपर्‍या पुढील आदेशापर्यंत बंद असतील. या बंदमधून फक्‍त जीवनावश्यक वस्तू, अन्‍नधान्ये, भाजीपाला, दूध आणि औषध विक्री वगळण्यात आली आहे.

सुरू राहणार :- पेट्रोल पंप, मेडिकल, बँक, सार्वजनिक वाहतूक सेवा, किराणा दुकान, भाजीपाला, दूध, रुग्णालये, वृत्तपत्रे या बंदच्या काळात सुरू राहतील.

बंद राहणार :- राज्यभरातील मॉल्स, जिम्स, जलतरण तलाव, चित्रपटगृहे, नाट्यगृहे यापूर्वीच बंद करण्यात आली आहेत. शुक्रवारी मध्यरात्रीपासून राज्य शासनाने पुकारलेल्या प्रदीर्घ शासकीय बंदच्या काळात खासगी कार्यालये, उद्योग, दुकाने, छोट्या-मोठ्या आस्थापना, हॉटेल्स, रेस्टॉरंटस्, चहाच्या, पानांच्या टपर्‍या बंद असतील.

काय वगळण्यात आलं ? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार दि. 22 रोजी सकाळी 7 ते रात्री 9 या वेळेत जनता संचारबंदी पाळावी, असे आवाहन केले आहे. या जनता संचारबंदीतून वैद्यकीय सेवा, पोलिस, वृत्तपत्रे यांना वगळण्यात आले आहे. तसेच औषध दुकाने, दूध पुरवठा आदी सेवाही वगळण्यात आल्या आहेत
कोरोना च्या पार्श्वभूमीवर प्रवाशांनी वैयक्तिक पातळीवर खबरदारी घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. दरम्यान कोणी संशयित आढळल्यास तपासणी पथकाच्या ताब्यात देण्यात येईल असंही रेल्वे प्रशासनाने सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *