महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १५ जानेवारी । सध्यातरी बाजारात भारंभार इलेक्ट्रीक स्कूटर येत असल्या तरी लोकांमध्ये खूप कन्फ्यूजन आहे. आपला निर्णय तर चुकणार नाही ना? असे अनेकांना वाटत आहे. कारण या कंपन्यांना कुठलाच अनुभव नाहीय.
पेट्रोलच्या किंमती दिवाळीपासून स्थिर आहेत. पाच राज्यांच्या निवडणुका असल्याने हे होत असले तरी कमी होत नसल्याने भविष्यात वाढण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षात इंधनाच्या किंमतींनी शंभरी पार करून अटकेपार झेंडे रोवले होते. यामुळे पेट्रोलच्या स्कूटर चालविणे लोकांना परवडत नाहीय. यामुळे गेल्या वर्षात इलेक्ट्रीक स्कूटरचे पेव फुटले आहे.
सध्यातरी बाजारात भारंभार इलेक्ट्रीक स्कूटर येत असल्या तरी लोकांमध्ये खूप कन्फ्यूजन आहे. आपला निर्णय तर चुकणार नाही ना? असे अनेकांना वाटत आहे. कारण या कंपन्यांना कुठलाच अनुभव नाहीय. आल्या दिवशी कुठली ना कुठली स्टार्टअप उठते आणि इलेक्ट्रीक स्कूटर लाँच करत आहे. यामुळे अनेकदा ग्राहक पेट्रोल स्कूटरकडेच वळत आहेत.
पहायला गेले तर ईव्ही स्कूटरचे व पेट्रोलवरील स्कूटर अशा दोन्हींचे फायदे, तोटे आहेत. यामुळे निर्णय घेताना याचा विचार व्हायला हवा. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, कोण कोणत्या गोष्टी विचारात घ्यायला हव्यात.
ईव्ही स्कूटरचे फायदे कोणते?
विजेवर चालणारी कोणतीही कार, स्कूटर नव्या पीढीची आहे. सध्या लोकांना याच वाहनांचे आकर्षण आहे. इलेक्ट्रीक स्कूटर चालविणे सोपे असते.
इलेक्ट्रीक स्कूटरमध्ये जास्त टॉर्क असतो, म्हणजेच पुढे जाण्यासाठी लागणारी ताकद. यामुळे चालविणाऱ्याला चांगले वाटते.
विजेवर चालत असल्याने याची रनिंग कॉस्ट खूप कमी असते. एका किमीला जवळपास ५० पैसे एवढा खर्च येतो.
आता ईव्हीचे नुकसान पाहू….
इलेक्ट्रीक स्कूटर पेट्रोल स्कूटरच्या तुलनेत महाग असतात. पेट्रोल स्कूटर अनेक वर्षे चालतात, परंतू ईव्हीची बॅटरी लाईफ ही ४ वर्षांपर्यंतच सिमीत असते. काही कंपन्या जास्त वॉरंटी देतात. जर बॅटरी बदलायची झाली तर ४० ते ६० हजार रुपये खर्च आहे. यामुळे बॅटरी स्वॅपिंगची स्कूटर घेतली तर फायद्यात राहू शकता.
इलेक्ट्रीक स्कूटरचे पार्ट्स अद्याप बाजारात उपलब्ध झालेले नाहीत. तसेच चार्जिंग स्टेशनही नाहीत. विजेच्या बिलाचा शॉक बसण्याच्या भीतीने तुम्हाला लोक त्यांच्या घरी चार्जही करायला देत नाहीत. यामुळे जवळच्या जवळच तुम्ही या स्कूटर वापरू शकता. ओलाने तिच्या स्कूटरला १८५ किमीची रेंज सांगितली मात्र, प्रत्यक्षात १०० किमीही मिळत नाही अशी ग्राहकांची बोंब आहे.
पेट्रोल स्कूटरचे फायदे…
पेट्रोल स्कूटर स्वस्त असतात. ही स्कूटर कुठेही बिघ़डली तर ती दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला जास्त त्रास होत नाही. स्पेअर पार्टही आरामात मिळून जातात. तुम्हाला माहिती आहेच, की तुम्ही लांबचा प्रवासही करू शकता.
पेट्रोल स्कूटरचे नुकसान
पेट्रोल स्कूटरची रनिंग कॉस्ट आता वाढली आहे. किमीला अडीच ते तीन रुपये खर्च येतो. तसेच पर्यावरणासाठी नुकसान करणारी आहे.