महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १७ जानेवारी । श्री हरेश्वर गाडेकर आणि त्यांच्या पत्नी हे दोघेही तीव्र अस्थिव्यंग दिव्यांग आहेत. त्यांचा ट्रॉफी बनवण्याचा व्यवसाय आहे.त्यांच्याकडे संगणक नसल्यामुळे ट्रॉफीसाठीचे डिझाईन बनवण्यासाठी त्यांना इतरांकडे जावे लागत असे. हरेश्वर दोन्ही पायांनी अस्थिव्यंग दिव्यांग असल्यामुळे त्याच्या शारीरिक हालचालीमुळे ग्राहकांना वेळेवर काम न दिल्यामुळे त्यांचा व्यवसाय आर्थिक अडचणीत सापडला होता. अशा होतकरु दिव्यांग दांपत्यास उडान दिव्यांग फाउंडेशनच्या वतीने पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्ष श्री. बापूसाहेब कातळे यांच्याकडून संगणक देण्यात आला.
यावेळी उडान दिव्यांग फाउंडेशनचे अध्यक्ष आनंद बनसोडे,उपाध्यक्ष योगेश सोनार, कार्याध्यक्ष मोहम्मद रफी पटेल,सचिव बाळासाहेब तरस, खजिनदार रवी भिसे,नंदकुमार तरस उपस्थित होते.
याप्रसंगी उडान दिव्यांग फाऊंडेशनचे अध्यक्ष आनंद बनसोडे म्हणाले समाजातील दानशूर व्यक्तींच्या पुढाकारातून जे काम होऊ शकते ते काम शासनही करु शकत नाही आज बापूसाहेब कातळे यांच्या मदतीमुळे एका दिव्यांग कुटूंबाचा उदरनिर्वाह सुरळीत होईल या सेवाकार्यामुळे मिळणारे आत्मिक समाधान अमूल्य आहे. उडान दिव्यांग फाउंडेशनच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिलाय तसेच पुढील काळातही दिव्यांगांच्या सर्वांगीन पुनर्वसनासाठी कायमच कार्यरत राहणार आहे.