या दिवशी चित्रपटगृहामध्ये रिलीज होणार ‘झोंबिवली’

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१८ जानेवारी । प्रेक्षकांना आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘झोंबिवली’ या चित्रपटाची आतुरतेने उत्कंठा होती, पण आता प्रेक्षकांची या चित्रपटाबाबत असलेली उत्कंठा संपलेली आहे. कारण नुकतीच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. अभिनेता ललित प्रभाकर, वैदेही परशुराम आणि अमेय वाघ यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत सांगितली आहे. चित्रपटाचे पोस्टर शेअर करत तिघांनी लिहिले आहे ‘आम्ही पाच, पडणार झोंब्यांवर भारी ! 26 जानेवारीला येतोय करून सगळी तयारी ! ‘झोबिंवली’ हा चित्रपट 26 जानेवारी 2022ला चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे.

https://www.instagram.com/lalit.prabhakar/?utm_source=ig_embed&ig_rid=32d292cc-05a3-4730-b8a3-92e28ffab11f

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *