महाराष्ट्र २४ ; ऑनलाईन ; मुंबई : राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ५२ झाली असून पिंपरी चिंचवड, पुणे येथे प्रत्येकी एक तर मुंबई येथे दोन, असे चार नवे रुग्ण आढळले आहेत. रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोनाग्रस्तांमधील ४१ जणांची प्रकृती उत्तम असून, ८ जणांना सौम्य लक्षणे आहेत. तर कस्तुरबा रुग्णालयातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या २२३ वर गेली आहे.
कोरोनाबाधित ५ रुग्ण आजारमुक्त झाले असले, तरी त्यांना चौदा दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण होईपर्यंत रुग्णालयातच ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर, चाचणी घेऊन घरी सोडण्याबाबत निर्णय घेतला जाईल.