केंद्र सरकारकडून पीएम किसान सन्मान निधी योजनेत महत्वपूर्ण बदल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १९ जानेवारी । केंद्र सरकारडून पीएं किसान सन्मान निधी योजनेसंदर्भातील कागदपत्रात बदल करण्यात आले आहेत. पीएम किसान योजनेबाबत दस्तऐवजात हा बदल फसव्या कारवायांना आळा घालण्यासाठी सरकारने दस्तऐवज नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. या बदलांतर्गत, पीएम किसानचा लाभ केवळ त्या शेतकऱ्यांनाच मिळणार आहे, जे या योजनेअंतर्गत पात्र आहेत. या दस्तऐवजात बदल होण्यापूर्वी, ज्यांचे अर्ज एकतर बनावट होते किंवा पात्र नव्हते, असे अनेक लोक या योजनेचा लाभ घेत होते.

पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, नवीन नियमानुसार, आता या योजनेत रेशन कार्ड देणे सरकारने अनिवार्य केले आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना आता त्यांचा राशन कार्ड क्रमांक, आधार कार्डची सॉफ्ट कॉपी, बँक पासबुक आणि घोषणापत्र सादर करावे लागणार आहेत. या कागदपत्रांशिवाय शेतकरी योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.

दरम्यान मागील काही दिवसांपूर्वी आलेल्या बातमीनुसार, उत्तर प्रदेशमध्ये ७ लाख शेतकरी असे आहेत, ज्यांना पीएम किसान सन्मान निधीच्या १०व्या हप्त्याचे पैसे परत करावे लागणार आहेत. कारण या योजनेत हे शेतकरी अपात्र आढळले आहेत. त्यामुळे अटी व शर्तीनुसार ही रक्कम या शेतकऱ्यांना परत करावी लागणार आहे. प्रत्येक शेतकऱ्यासाठी २००० रुपये याप्रमाणे ४० लाख रुपये परत मिळतील, असे म्हटले जात आहे. माहितीसाठी, पीएम किसान योजनेंतर्गत, प्रत्येकी २००० रुपयांच्या तीन मासिक हप्त्यांमध्ये दरवर्षी ६ हजार रुपये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *