२८ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आंतरराष्ट्रीय व्यावसायिक प्रवासी उड्डाणे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२० जानेवारी । देशातील कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत असून काल दिवसभरात देशात २,८२,९७० नवीन कोरोनाबाधितांसह ४४१ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. सध्या देशात १८ लाख ३१ हजार सक्रिय रुग्ण असून डेली पॉझिटिव्हीटी रेट १५.१३ टक्क्यांवर पोहोचला आहे. काल दिवसभरात ओमिक्रॉनबाधितांच्या संख्येतही वाढ नोंदवण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ओमिक्रॉनचे ८ हजार ९६१ रुग्ण आढळले आहेत.

याच दरम्यान, २८ फेब्रुवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय व्यावसायिक प्रवासी उड्डाणे बंद राहतील, असे नागरी विमान वाहतूक महासंचालकांनी बुधवारी जारी केलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय मालवाहू उड्डाणांना हे निर्बंध लागू होत नाहीत, ज्यांना डीजीसीएने मंजूरी दिली आहे आणि ज्या देशांसोबत भारताने एअर बबल व्यवस्था केली आहे, अशा देशांतील उड्डाणे, सुरू राहतील. डीजीसीएने यापूर्वी १५ डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय मागे घेत ३१ जानेवारी २०२२ पर्यंत बंदी वाढवली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *