महाराष्ट्र २४ ; ऑनलाईन ; मुंबई : देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने सॅनिटायझर आणि फेस मास्कची किंमत निश्चित केली आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी फेस मास्क आणि हँड सॅनिटायझर्सच्या काळ्या बाजारामुळे शुक्रवारी एका ट्विटद्वारे ही माहिती दिली. ते म्हणाले की, कोरोना व्हायरसचा उद्रेक झाल्यापासून बाजारपेठेत वेगवेगळ्या फेस मास्क, त्याच्या उत्पादनात वापरल्या जाणार्या वस्तू आणि हात सॅनिटायझरच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सरकारने गांभीर्याने घेत त्यांच्या किंमती निश्चित केल्या आहेत.
केंद्र सरकारने दोन आणि तीन प्लाय सर्जिकल फेस मास्क आणि हँड सॅनिटायझर्सची किंमत निश्चित केली आहे. पासवान म्हणाले, “अत्यावश्यक वस्तू कायद्यांतर्गत दोन आणि तीन प्लाय मास्कमध्ये वापरल्या जाणार्या फॅब्रिकची किंमत १२ फेब्रुवारी २०२० रोजी होती, त्याचप्रमाणे तीन प्लाय मास्कची किरकोळ किंमत आठ रुपये प्रति मास्क आणि तीन प्लाय मास्कची १० रुपयापेक्षा जास्त असणार नाही.
केंद्रीय मंत्री म्हणाले की, हँड सॅनिटायझरच्या २०० एमएल बाटलीची किरकोळ किंमत १०० रुपयांपेक्षा जास्त होणार नाही. इतर आकाराच्या बाटल्यांची किंमत त्याच प्रमाणात राहील. ३० जून २०२० पर्यंत देशभरात या किंमती लागू राहतील. दुकानदार मास्क आणि सेनिटायझर्स तिप्पट दराने विकत आहेत.