महाराष्ट्र २४ ; ऑनलाईन ; लंडन : कोरोनाव्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. यातून क्रीडा जगदेखील सुटू शकलेले नाही. बऱ्याच खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. यातील बहुतेक फुटबॉलपटू होते. मात्र आता क्रिकेटविश्वातही कोरोना घुसला आहे. स्कॉटलॅंडच्या खेळाडूला कोरोनाची लागण झाली आहे. क्रिकेट जगातील हे पहिलेच प्रकरण आहे. त्यामुळं सध्या भीतीचे वातावरण आहे.
याआधी अनेक क्रिकेटपटूंची चाचणी करण्यात आली होती. मात्र त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. सध्या दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडमधील खेळाडू क्वारंटाईनमध्ये आहेत. यातच पाकिस्तानी वंशाचा फिरकीपटू माजिद हकला कोरोना झाल्यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. स्कॉटलंडचा पाकिस्तानी वंशाचा क्रिकेटपटू माजीद हक हा कोरोना विषाणूंमुळे पॉझिटिव्ह आढळला आहे.