“अफवा पसरवणाऱ्या वेबसाइट्स आणि यु ट्यूब चॅनल्स बंद करणार”, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची माहिती

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२० जानेवारी । खोटी माहिती पसरवणाऱ्या आणि भारतविरोधी षडयंत्र करणाऱ्या वेबसाईट्स आणि युट्यूब चॅनलवर बंदी घालणार असल्याची मोठी घोषणा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने खोटी माहिती पसरवणे आणि भारताविरोधी षडयंत्र केल्याचा ठपका ठेवत २० युट्यूब चॅनल आणि २ वेबसाईट्सवर बंदी घातली होती. आता या निर्णयानंतर केंद्र सरकार अशा वेबसाईट्स आणि युट्यूबवर कारवाई सुरूच ठेवणार असल्याचा इशारा अनुराग ठाकूर यांनी दिलाय.

अनुराग ठाकूर म्हणाले, “मी खोटी माहिती पसरवणाऱ्या वेबसाईट्स आणि युट्यूब चॅनलवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. मला आनंद आहे की जगभरातील मोठ्या देशांनी याची दखल घेतली आहे. युट्यूबने देखील समोर येत अशा युट्यूब चॅनलला ब्लॉक केलंय.”

गुप्तचर संस्थांशी समन्वय करत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने भारतविरोधी आणि खोटी माहिती पसरवण्याचा ठपका ठेवत डिसेंबर २०२१ मध्ये २० युट्यूब चॅनल आणि २ वेबसाईट्सवर बंदी घातली होती. यातून समाजात फूट पाडणाऱ्या वेबसाईट्स आणि युट्यूब चॅनलवर भविष्यात देखील कारवाई सुरूच राहिल, अशी माहिती अनुराग ठाकूर यांनी दिली.

डिसेंबरमधील कारवाईनंतर अनुराग ठाकूर म्हणाले होते, “बंदी घातलेले युट्यूब चॅनल आणि वेबसाईट्स पाकिस्तानमधून चालवले जात होते. ते भारतासंबंधी संवेदनशील विषयांवर खोटी माहिती पसरवत होते. या वेबसाईट्स आणि युट्यूब चॅनलवर काश्मीर, भारतीय सैन्य, भारतातील अल्पसंख्याक समुह, राम मंदीर, जनरल बिपीन रावत इत्यादी विषयांवर विभाजनकारी माहिती पसरवली जात होती.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *