पुढच्या आठवड्यापासून ‘या’ देशात मास्क घालण्याची गरज नाही, देशात Omicron चा उच्चांक

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२० जानेवारी । दोन महिन्यांपूर्वी आटोक्यात आलेल्या कोरोनानं (Corona Virus) पुन्हा एकदा जगभर थैमान घातला आहे. दक्षिण आफ्रिकेत (South Africa) आढळून आलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे (omicron variant) कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. नवीन व्हेरिएंट आढळून आल्यानंतर कोरोनाचे रुग्ण (Corona patients) वाढत चालले आहेत. अशातच इंग्लंडमध्ये नवा नियम काढण्यात आला आहे. इंग्लंडमध्ये (England) पुढील आठवड्यापासून लोकांना मास्क घालण्याची (wear masks) गरज नाही. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी बुधवारी कोविडशी संबंधित नियम शिथिल करण्याची घोषणा केली.

पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson)यांनी सांगितले की, शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉनच्या नवीन व्हेरिएंटची लाट देशभरात शिगेला पोहोचली आहे. यादरम्यान सेल्फ-आयसोलेशनसाठी जारी केलेल्या कठोर नियमांचे रिन्यू न करण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. सध्याचे सेल्फ आयसोलेशन नियम मार्चमध्ये संपत आहेत.

दरम्यान हाऊस ऑफ कॉमन्समधील खासदारांना दिलेल्या निवेदनात पंतप्रधान म्हणाले होते की, नाइटक्लब आणि मोठ्या कार्यक्रमांमध्ये प्रवेश करण्यासाठी कोविड पासपोर्टची आवश्यकता रद्द केली जाईल. दरम्यान संघटनेस हवे असल्यास ते NHS COVID पास वापरू शकतात. लोकांना घरून काम करण्याचा सल्ला दिला जाणार नाही. फेस मास्कची गरज भासणार नाही, मात्र लोकांना बंद किंवा गर्दीच्या ठिकाणी चेहरा कव्हर करण्याचा सल्ला दिला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *