महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २१ जानेवारी । बाजार नियामक मंडळाने (सेबी) मंजुरी दिल्यानंतर गुंतवणूकदारांना चांदीत गुंतवणूक करण्याचा चांगला पर्याय मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचांदीच्या दरात वाढ होत आहे. चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाली असून 61 हजार रुपये प्रतीकिलो असणारी चांदी 64 हजार रुपये प्रतीकिलोपर्यंत पोहचली आहे. त्यामुळे गोल्ड ईटीएफप्रमाणे सिल्वर ईटीएफमधील गुतंवणूकही फायदेशीर ठरणार असून त्यात कमी जोखीम असून चांगले रिटर्न मिळण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
सेबीने गेल्या वर्षी सिल्वर ईटीएफसाठी नियमावली जारी केली आहे. त्यानंतर देशातील पहिला सिल्वर ईटीएफ नव्या वर्षात लॉन्च झाला. आगामी काळात आणखी काही सिल्वर ईटीएफ आले असून त्यात गुंतवणुकीची चांगली संधी आहे. सिल्वर ईटीएफ गुतंवणुकीचे वाशिष्ट्य म्हणजे यात 100 रुपयांपासूनही गुंतवणूक करता येते. म्युचूअल फंड हाऊसकडून ईटीएफसह फंड ऑफ फंडही लॉन्च करण्यात येत आहेत. यात गुंतवणुकीसाठी डीमॅट अकाऊंटची गरज भासत नाही. तसेच यात गुंतवणूक करण्यासाठी एसआय़पीचाही ( सिस्टीमॅटिक इन्सव्हेंसमेटं प्लॅन) पर्याय असतो.