महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२२ जानेवारी । गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने होत असलेल्या वाढीला ब्रेक लागला आहे. या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी सोने (Gold) स्वस्त झाले, तर चांदी (Silver) महाग झाली. सोने सध्या 7600 रुपयांनी आणि चांदी 15,000 रुपयांनी स्वस्त होत आहे. मात्र, या व्यापार आठवड्यात सोने प्रति दहा ग्रॅम 473 रुपयांनी तर चांदी 3082 रुपयांनी महागली आहे.
या व्यापार आठवड्याच्या पाचव्या दिवशी शुक्रवारी सोने 93 रुपये प्रति दहा ग्रॅमने महागले आणि 48608 रुपयांवर बंद झाले. शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी गुरुवारी सोने 48705 रुपयांवर बंद झाले होते. तर चांदीचा भाव 865 रुपयांनी वाढून 64941 रुपये प्रति किलोवर बंद झाला. याआधी गुरुवारी चांदी 64476 प्रति किलोच्या दराने बंद झाली होती. सराफ बाजारातील तज्ज्ञांच्या मते, लोकांना अजूनही स्वस्त सोने-चांदी (Gold-Silver) खरेदी करण्याची संधी आहे. कारण येत्या काही दिवसांत सोन्यासोबतच चांदीच्या दरातही आणखी वाढ होऊ शकते.
शुक्रवारी 24 कॅरेट सोने 48608 रुपये प्रति 10 ग्रॅम, 23 कॅरेट सोने 48413 रुपये प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने 44525 रुपये प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने 36456 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 14 कॅरेट सोने सुमारे 126843 रुपये होते. 10 ग्रॅमच्या पातळीवर बंद झाले आहे.