पंतप्रधान मोदींकडून प्रकृतीची विचारपूस, शरद पवारांनी मानले आभार

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२४ जानेवारी ।राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना कोरोनाची लागण झाली आहे. ट्विट करून पवार यांनी ही माहिती दिली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरू असून, संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घ्यावी, असं आवाहन पवार यांनी केलं आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendr Modi) यांनी शरद पवार यांना फोन करुन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. स्वत: शरद पवार यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये शरद पवार पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले आहेत.

शरद पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी माझ्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी फोन केला. त्याच्या काळजीबद्दल आणि शुभेच्छांबद्दल मी आभारी आहे.

शरद पवार ट्विट करत कोरोनाची लागण झाल्याची माहिती होती ‘माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी उपचार घेत आहे. काळजीचे कोणतेही कारण नाही. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती की त्यांनी योग्य चाचण्या करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी’, असं शरद पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

कोरोनाची लागण झाल्याने खबरदारी म्हणून शरद पवार यांचे सर्व राजकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. राज्य महिला आयोगाच्या २९व्या वर्धापण दिनानिमित्ताने २५ जानेवारीला शरद पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचं आयोजन करणअयात आलं होतं. पण या कार्यक्रमाला शरद पवार अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *