राऊतांचा फडणवीसांवर जोरदार पलटवार ; …….. या संदर्भातील एखादं अभ्यास शिबिर ठेवू. कोणाला त्याचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी यावे

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२४ जानेवारी ।मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजप-शिवसेना युतीविषयी भाष्य केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या पलटवार केला होता. तुमचा पक्ष जन्माला येण्यापूर्वी मुंबईत आमचे नगरसेवक होते असे फडणीस म्हणाले होते. आता त्यांना संजय राऊतांनी सडेतोड शब्दांमध्ये उत्तर दिले आहे. भाजपचा जन्मही झाला नव्हता तेव्हा सेनेचे आमदार-नगरसेवक निवडणूक आले होते असे म्हणत हे सर्व तुमच्या जन्मापूर्वीचे आहे असा टोला देखील राऊतांनी लगावला आहे.

माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, ‘भाजपाचा जन्म हा 1980 च्या दशकामध्ये झालेला आहे. जनता पक्षाचे पतन झाल्यानंतर हे झाले होते. तर शिवसेनेचा जन्म हा 1969 चा आहे. शिवसेनेचा पहिला महापौर या मुंबईत शहरात डॉ. गुप्ते हे कधी झाले, त्यावेळी आमचे किती नगरसेवक निवडून आले होते? या संदर्भातील एखादं अभ्यास शिबिर आम्ही रामभाऊ म्हाळगी प्रबोधनीमध्ये ठेवू. जर कोणाला त्याचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी यावे.’ असा टोला राऊतांनी लगावला आहे.

पुढे राऊत म्हणाले की, ‘शिवसेनेचे पहिले आमदार वामराव महाडिक हे देखील याच काळात निवडून आले होते. गिरगावमधून प्रमोद नवलकर हे देखील आमदार म्हणून निवडून आलेले होते. माझगावामधून छगन भुजबळ देखील निवडून आले होते. आमचे वाघ मुंबईमधून अनेक वेळा निवडून आलेले आहेत. या गोष्टी भाजपच्या जन्मापूर्वीच्या आहेत. मात्र असंय की, देवेंद्र फडणवीस यांचा तेव्हा मुंबईशी आणि महाराष्ट्राच्या राजकारणाशी जास्त काही संबंध नसेल. या सगळ्या गोष्टी फडणवीस यांच्या जन्माच्या अगोदरच्या आहेत.’ असा चिमटा देखील राऊतांनी काढला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *