Post Office Scheme : ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची खास बचत योजना, जाणून घ्या अधिक माहिती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२४ जानेवारी । पिंपरी चिंचवड । आपल्या देशातील ज्येष्ठ नागरिक (Senior citizens) अद्यापही डिजिटल तंत्रज्ञानाशी (digital technology) फारसे एकरूप झालेले नाहीत. माफक शिक्षण आणि माहिती तंत्रज्ञानाच्या पुरेशा ज्ञानाअभावी त्यांना नवीन तंत्रज्ञान हाताळण्यात अडचणी येतात. त्यामुळे, आजही त्यांना पैशांच्या बचतीसाठी पोस्ट ऑफिस (post office) योजना सर्वात सोयीस्कर वाटतात. बँक आणि बँक स्कीम्सचं प्रस्थ वाढत असूनही जेष्ठ नागरिकांमध्ये पोस्टाच्या बचत (post office savings schemes) योजना विशेष लोकप्रिय आहेत. आजही आपल्या देशातील मध्यमवर्गीय नागरिक गुंतवणूक करताना, निश्चित आणि चांगल्या व्याजदरांसह रिटर्न्स देणाऱ्या इन्व्हेस्टमेंट स्कीम्सचा विचार करतात. विशेषत: सेवानिवृत्त झालेले ज्येष्ठ नागरिक तर अशाच स्कीम्सना प्राधान्य देतात. कारण, त्यांचं पुढील आयुष्य बहुदा सेवानिवृत्तीच्या पैशांवरच अवलंबून असतं. अशा नागरिकांचा विचार करून भारतीय पोस्ट विभागानं (Indian Post) देशातील नागरिकांसाठी रिस्क फॅक्टर (Risk Factor) नसलेल्या अनेक बचत योजना उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

सेवानिवृत्तीनंतरही ज्येष्ठ नागरिकांना निश्चित उत्पन्न मिळत रहावं यासाठी, पोस्ट ऑफिसनं ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) सुरू केली आहे. वयाची 60 वर्षे पूर्ण केलेला कोणताही भारतीय नागरिक योजनेचा लाभ घेऊ शकतो. काही विशिष्ट अटींनुसार लाभार्थ्यांसाठी (beneficiaries) आरक्षणही (reservations) देण्यात आलं आहे. या स्कीमच्या मदतीनं ग्राहकांना पोस्ट ऑफिसमधून योग्य प्रमाणात परतावा आणि निश्चित उत्पन्न मिळू शकतं.

जर एखाद्या ग्राहकानं एससीएसएसमध्ये दरमहा आठ हजार 334 रुपये जमा केले, तर पाच वर्षांनी स्कीम मॅच्युअर झाल्यानंतर सुमारे सात लाख रुपये रिटर्न मिळेल. या स्कीममध्ये एखाद्या खातेधारकानं प्रत्येक महिन्याला आठ हजार 334 रुपये जमा केले तर एका वर्षात त्याचे एक लाख रुपये जमा होतील. याचा अर्थ असा आहे की पाच वर्षांमध्ये, निव्वळ ठेवीची (deposit) रक्कम पाच लाख रुपये होईल. व्याजासह ही रक्कम सात लाख रुपयांच्या आसपास जाऊ शकते. कारण, पोस्टाच्या या स्कीमवर 7.4 टक्के दरानं व्याज दिलं जातं. त्यानुसार कॅलक्युलेशन केल्यास फक्त व्याजाची रक्कम एक लाख 85 हजार रुपये होते. याचाच अर्थ पाच वर्षांच्या कालावधीत खातेदाराच्या अकाऊंटमध्ये सहा लाख 85 हजार रुपये जमा होतील. पोस्टाच्या या स्कीमध्ये पीपीएफ (PPF) खात्याप्रमाणं व्याज दिलं जातं. म्हणजेच दर तीन महिन्याच्या हिशोबानं व्याजाची गणना केली जाते. याचा अर्थ लाभार्थ्याला प्रत्येक तिमाहीत नऊ हजार 250 रुपये व्याज म्हणून मिळते.

वर नमूद केल्याप्रमाणे, या स्कीममध्ये 7.4 टक्के दरानं व्याज मिळतं. स्कीमचा सुरुवातीचा मॅच्युरिटी पिरियड (maturity period) पाच वर्षे आहे. परंतु, तुमच्या सोयीनुसार तो पुढे वाढवता येऊ शकतो. स्कीमचा मॅच्युरिटी पिरियड संपल्यानंतर एका वर्षाच्या लाभार्थी स्कीमचा कालवधी वाढण्यासाठी अर्ज करू शकतो. कुठलाही लाभार्थी तीन वर्षांच्या कालावधीसाठी स्कीमचा मॅच्युरिटी पिरियड वाढवून घेऊ शकतो. मात्र, ही सुविधा एकदाच घेता येते.

60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची कोणतीही व्यक्ती पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजनेअंतर्गत (SCSS) खातं उघडू शकते. असं असलं तरी, 55 वर्षांपेक्षा जास्त वयाचे नागरी कर्मचारी (civilian employees) सेवानिवृत्तीचे लाभ मिळण्याच्या एका महिन्याच्या आत एससीएसएसमध्ये खातं उघडू शकतात. संरक्षण कर्मचार्‍यांसाठी (Defence employees) वयाची मर्यादा तर 50 वर्षांपर्यंत खाली आणण्यात आली आहे.

बँकातील व्याजदरांचा विचार केला तर सध्या व्याजदर खूप कमी झालेले आहेत. शिवाय बँकेमध्ये जाऊन व्यवहार करणं ज्येष्ठ नागरिकांसाठी काहीसं गोंधळात टाकणारं ठरतं. अशा स्थितीमध्ये पोस्ट ऑफिसमध्ये पैसे गुंतवले तर नक्कीच त्यांना जास्त फायदा होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *