महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२५ जानेवारी । पिंपरी मोरवाडी । केंद्रीय श्रमिक शिका बोर्ड भारत सरकार यांच्या मार्फत महिलांसाठी होणाऱ्या प्रशिक्षणास आज पासून आपल्या मोरवाडी येथील कापसे उद्यान येथे दोन दिवसीय प्रशिक्षणास सुरुवात झाली या प्रशिक्षणामध्ये महिला उद्योजकता विकास प्रशिक्षण, महिला कायदे, महिलांसाठी शासनाच्या मार्फत अनुदान व कर्ज योजनांची माहिती महिला सक्षमीकरण व सबलीकरण यावर मार्गदर्शन व त्याचबरोबर आरोग्य विषयक माहिती येथे दिली जाणार आहे सदर प्रशिक्षणास उपस्थित राहून महिलांना प्रशिक्षणाची माहिती श्री सुधाकर रामफुले यांनी दिली.
याप्रसंगी नगरसेविका अनुराधाताई गोरखे, सौ. सोनाली हिंगे पल्लवी ताई मरकड, रेणुका ताई साखरे, आनंदा कुदळे, प्रशिक्षक सुधाकर जी फुले, गाडे सर, झिरपे सर,माडगूळकर सर व आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन सौ रोहिणीताई रासकर सौ. रेणुकाताई भोजने यांनी केले.