तुमचे ऑनलाइन ई-चलन कसे भराल ? येथे जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२५ जानेवारी । आजच्या डिजिटल युगात आपली अनेक कामे आता घरी बसून केली जातात. आजकाल वाहतूकीचे नियम मोडल्यास तुम्हाल दंड देखील ऑनलाईन पाठवण्यात येत आहे. त्यामुळे आज आपण अशीच एक महत्वाची गोष्ट जाणून घेणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही वाहतुकीचे नियम मोडल्यास मिळणारे ऑनलाइन ई-चलन (E-Challan) सहज भरू शकाल..

भारतातील रस्ते सुरक्षा लक्षात घेऊन वाहतुकीचे नियम अतिशय कडक करण्यात आले आहेत. त्याआधी रस्ता सुरक्षा ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. चुकीच्या पध्दतीने वाहन चालवल्याने आपला जीव तर धोक्यात येतोच, पण त्यामुळे इतरांचेही नुकसान होऊ शकते. या कारणास्तव, रस्त्यावर नियमांचे पालन करून वाहन काळजीपूर्वक चालवणे गरजेचे असते. रस्ता सुरक्षा लक्षात घेऊन रस्त्यावर अनेक कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तुम्ही वाहन चालवताना कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास तुमचे चलन कापले जाते, दरम्यान हे ऑनलाइन ई-चलन भरण्याचे प्रोसेस आज आपण पाहाणार आहोत.

तुमचे ई-चलन ऑनलाइन भरता येईल

– तुमचे ई-चलान भरण्यासाठी तुम्हाला https://echallan.parivahan.gov.in/ ला भेट द्यावी लागेल.

– आता तुम्हाला Check online services मध्ये खाली ड्रॅग करून चेक Check Challan statusपर्याय निवडावा लागेल.

– हे केल्यानंतर, तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स क्रमांक, वाहन क्रमांक किंवा चलन क्रमांकाच्या मदतीने तुमचे चलन शोधावे लागेल.

– याशिवाय, तुम्ही तुमचा इंजिन क्रमांक किंवा चेसिस क्रमांकाचे शेवटचे पाच क्रमांक टाकूनही हे करू शकता.

– तुमचे डिटेल्स टाकल्यानंतर तुम्हाला Get Detail चा पर्याय निवडावा लागेल.

– आता चलनाचे सर्व डिटेल्स तुमच्या स्क्रीनवर दिसतील.

– चलन भरण्यासाठी, तुम्हाला चलनाच्या पुढे लिहिलेला Pay now हा पर्याय निवडावा लागेल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *