MSRTC: एसटी महामंडळात भरती होणाऱ्या नवीन कंत्राटी कर्मचाऱ्यांची पिळवणूक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२५ जानेवारी । उस्मानाबाद: एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केल्याने गेल्या ३ महिन्यापासून राज्यातील (state) एसटी (ST) बंद आहे. वेगवेगळे पर्याय वापरून आंदोलन मागे घेण्यास आंदोलक तयार नाहीत. त्यामुळे एस.टी महामंडळाने आता कंत्राटी (Contract) पद्धतीने वाहक पदांची भरती सुरू केली आहे. या संदर्भात एका खाजगी कंपनीला (company) हे कॉन्ट्रॅक्ट दिले आहे. मात्र या कंपनीकडून या उमेदवारांची आर्थिक पिळवणूक होत आहे. गेल्या तीन ते चार दिवसापासून हे उमेदवार दररोज एस.टी महामंडळाच्या विभाग नियंत्रक कार्यालयात चकरा मारत आहेत. (Extortion new contract employees recruited ST Corporation)

त्यासोबतच यांना लागणाऱ्या वैद्यकीय प्रमाणपत्रांसाठी (certificate) ६०० रुपयांचा भुर्दंड येत आहे. सोबतच अनुभव प्रमाणपत्रासाठीही पैसे मोजावे लागत आहे. सरकारी रुग्णालयातून (hospital) घेतलेले वैद्यकीय प्रमाणपत्र चालत नसल्याने असा भुईंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे परिवहन महामंडळाच्या कंत्राटी वाहकपदाच्या भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांची त्रेधा उडत आहे. चार दिवस सातत्याने फेऱ्या मारूनही फॉर्म घेतले जात नसल्यामुळे त्यांचा वैताग वाढला आहे.

अर्ज स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यालाही (employee) कंपनीचे नेमके काय नाव आहे, याची माहिती नाही. जिल्ह्यात दररोज सरासरी ९० बस धावत आहेत. अधिक बस सोडण्यासाठी त्रयस्थ संस्थेकडून कंत्राटीचालक भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, परिवहन महामंडळाचे नियमानुसार कोणतेही नियंत्रण यावर नसल्यामुळे भरती प्रक्रियेत उमेदवारांची मोठी दमछाक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *