दिलेल्या शब्दाला जागले आनंद महिंद्रा; किक स्टार्ट जुगाड जीप बनवणारे दत्तात्रय लोहार झाले बोलेरोचे मालक

 144 total views

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २५ जानेवारी । देशातील घडामोडींवर केलेल्या ट्विटमुळे महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा हे कायमच चर्चेत असतात. त्यांनी काही आठवड्यांपूर्वीच महाराष्ट्रामधील सांगलीतील एका व्यक्तीला बोलेरो देण्याची ऑफर दिली होती. पण त्या व्यक्तीने या मोबदल्यात आपल्याला त्यांनी बनवलेली जुगाडू मिनी जीप गाडी द्यावी, असे महिंद्रा म्हणाले होते. तरी ही मिनी जीप बनवणाऱ्या अल्पशिक्षित दत्तात्रय लोहार यांनी स्वत: तयार केलेली गाडी देण्यास नकार दिला होता. त्यांनी आनंद महिंद्रांची ऑफर घरची लक्ष्मी कशी देऊ, असे म्हणत धुडकावली होती. पण लोहार यांनी त्यानंतर ही ऑफर स्वीकारली आणि आता दत्तात्रय लोहार यांच्या घरासमोर बोलेरो गाडी उभी राहणार आहे. आज आनंद महिंद्रांना टॅग करुन दत्तात्रय लोहार यांना महिंद्रा बोलेरो सुपूर्द केल्याच्या कॅप्शनसहित सांगलीमधील महिंद्रा शोरुमधील फोटो पोस्ट केले आहेत.

आमिर खानने थ्री इडियट्स चित्रपटामध्ये साकारलेले रँचो नावचे पात्र ज्याप्रमाणे जुगाड करुन व्हॅक्युम क्लिनर बनवले होते, तशीच गरज म्हणून सांगलीमधील एका व्यक्तीने जुगाड करुन चक्क एक मिनी जीप तयार केली आहे. आनंद महिंद्रांना ही जीप एवढी आवडली की त्यांनी ही जीपच या व्यक्तीकडून मागताना एक खास ऑफर दिली होती.

दुचाकीला किक स्टार्ट करताना आपल्यापैकी अनेकांनी पाहिले असेल, पण काही दिवसांपासून सोशल मीडियावर जीप किक स्टार्ट करतानाचा एक अनोखा व्हिडीओ चर्चेत आहे. आनंद महिंद्रा यांनी हाच व्हिडीओ त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर करत त्यावर प्रतिक्रिया दिली. हे स्पष्टपणे कोणत्याही नियमांशी जुळत नाही, परंतु आपल्या लोकांच्या साध्या स्वभावाचे आणि ‘किमान’ क्षमतेचे कौतुक करणे, मी कधीही थांबवणार नाही. गतिशीलतेची त्याची आवड आश्चर्यकारक असल्याचे म्हणत आनंद महिंद्रांनी हा व्हिडीओ शेअर केला होता.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ही गाडी बनवणारी व्यक्ती महाराष्ट्रामधील सांगली येथील असल्याची माहिती समोर आली. दुचाकीचे इंजिन, चारचाकी गाडीचे बोनेट आणि रिक्षाच्या चाकांचा वापर करुन ६० हजारांमध्ये ही भन्नाट किक स्टार्ट जीप अल्पशिक्षित दत्तात्रय लोहार यांनी तयार केली. स्वत:चे फॅब्रिकेशनचं वर्कशॉप असणाऱ्या दत्तात्रय यांनी जुगाड करुन तयार केलेली ही जीप ४० ते ४५ किलोमीटर प्रवास एक लिटर पेट्रोलमध्ये करते. त्यांच्याकडे सध्या अनेकांच्या अशाप्रकारची जीप बनवून देण्याची ऑर्डर्स येत असल्याचेही सांगितले. आनंद महिंद्रांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दत्तात्रय यांच्या कारनाम्याची चर्चा देशभरात चर्चा झाली.

आनंद महिंद्रांनी हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दत्तात्रय यांना ट्विटरवरुन एक ऑफर दिली होती. आज नाही तर उद्या स्थानिक प्रशासनाकडून या गाडीवर बंदी आणली जाईल, कारण ती नियमांमध्ये बसत नाही. त्यामुळेच मी स्वत: त्यांना या गाडीच्या मोबदल्यात बोलेरो देण्याची ऑफर देतो. त्यांनी निर्माण केलेली ही गाडी महिंद्रा रिसर्च व्हॅलीमध्ये आम्हाला प्रेरणा देण्यासाठी संग्राह्य ठेवली जाईल. या गाडीच्या माध्यमातून आम्हाला रिसोर्सनेसची शिकवण मिळेल, असे आनंद महिंद्रा म्हणाले होते. उपलब्ध गोष्टींमधून अधिक गोष्टी निर्माण करण्याचा धडा आम्हाला ही गाडी पाहून मिळेल, असे आनंद महिंद्रा म्हणाले होते. ही ऑफर आधी लोहार यांनी नाकारली होती. पण नंतर ही ऑफर त्यांनी स्वीकारली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *