आता पुन्हा एकदा Recharge करणं महागणार ?

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २५ जानेवारी । टेलिकॉम कंपन्यां सध्या आपला रिचार्ज प्लॅन वाढवण्याच्या तयारीत दिसत आहेत. ज्यामुळे पुढच्या काहीच दिवसात रिचार्ड प्रीपेड प्लॅनची किंमत वाढणार आहे. ज्याचा फटका त्यांच्या युजर्सला बसणार आहे. खरेतर, काही महिन्यांपूर्वी रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया वापरकर्त्यांनी त्यांचे रिचार्ज प्लॅन महाग केले होते. तसेच त्यांनी अनेक प्लॅन्समध्ये बदल देखील केला आहे. परंतु यानंतर आता Vodafone-Idea पुन्हा एकदा आपला रिचार्ज प्लान महाग करू शकतात अशी माहिती मिळत आहे.

पीटीआयमधील वृत्तानुसार, कंपनीच्या एका उच्च-स्तरीय अधिकाऱ्याने सांगितले की, या वर्षी पुन्हा एकदा दर सुधारित केले जाऊ शकतात, परंतु ते गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये करण्यात आलेली दरवाढ आणि बाजाराची प्रतिक्रिया यावर आधारित असेल.

Vodafone Idea चे MD आणि CEO रविंदर ठक्कर म्हणतात की, कंपनीने 4G सेवा वापरणार्‍या वापरकर्त्यांनुसार सुमारे एक महिन्याची सेवा वैधता देणार्‍या सर्वात किफायतशीर प्लॅनची ​​किंमत 99 रुपये निश्चित केली आहे, जी जास्त महाग नाही. तसेच हा प्लॅन युजर्ससाठी एक चांगली डिल आहे. परंतु त्यानंतर या वर्षीही हे प्लॅन महाग होऊ शकतात, अशी माहितीही त्यांनी दिली.

ग्राहक संख्या खूपच कमी असल्याने व्होडाफोन आयडियाला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे आणि ते आपले युजर्स टिकवण्यासाठी प्रयत्न देखील करत आहेत.

गेल्या आठवड्यात, कंपनीने सांगितले की, डिसेंबर 2021 मध्ये संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत, कंपनीचा एकूण तोटा वाढून 7 हजार 230.9 कोटी रुपये झाला आहे, जो एका वर्षापूर्वी याच तिमाहीत 4 हजार 532.1 कोटी रुपये होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *