पुण्याच्या जुई केसकरची अफलातून कर्तबगारी मिळाला ; राष्ट्रीय बाल पुरस्कार

 88 total views

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२६ जानेवारी । यंदाच्या प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारसाठी पुण्याच्या जुई केसकरची निवड झाली आहे. पार्किंसन्स आजाराशी झुंजणाऱ्या रुग्णांसाठी ‘जे ट्रेमर थ्रीडी’ नावाचे वेअरेबल ट्रेमर प्रोफाइलिंग उपकरण तयार केले आहे. एवढंच नव्हेतर जगभरात पार्किंसन्स आजाराबाबत सुरू असलेल्या संशोधनाबाबत व या उपचारासंदर्भातील माहिती देणारे ऑनलाइन बुलेटिन सुरू केले.

पुण्यातील बाणेर येथे द ऑर्किड स्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या जुईच्या काकाला पार्किंसन्स आजार आहे. काकाला तब्बल आठ वर्षे पार्किंसन्स आजाराशी झगडताना बघून जुईला आपण काही करू मदत शकतो का? या भावनेतून तिने याचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. याचा सखोल अभ्यास केल्यानंतर तिने अवघ्या पंधरा वर्षांच्या वयात तिने नावीन्यपूर्ण वेअरेबल ट्रेमर प्रोफाइलिंग उपकरण तयार केले . हे उपकरण हातमोजे स्वरूपातील असून प्रत्येक अंगाच्या थ्रीडी हालचाली कॅप्चर करते. शरीराच्या थरकापांचे प्रोफाइल तयार करून विश्लेषणासाठी क्लाऊड डेटाबेसकडे पाठवण्याचे काम करते.

उपकरण असे करते काम जुईने तयार केलेले उपकरण हातमोजे स्वरूपातील असून प्रत्येक अंगाच्या थ्रीडी हालचाली कॅप्चर करते. या उपकरणामुळे शरीराच्या थरकाप प्रोफाइलचे प्रतिनिधित्व करणारा मार्ग सापडला आहे. तिच्या उपकरणाला न्यूरोलॉजिस्टकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. या उपकारणांची चाचणी प्रक्रिया सुरु असून लवकरच पार्किंसन्स रुग्णांसाठी याचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे या आजाराने ट त्रस्त सर्वच रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. जुईचे वडील आयआयटी इंजिनिअर असून सध्या ते जर्मनीमध्ये आर्टिफिशिअल इंटिलिजन्स क्षेत्रात काम करतात. जुईची आई गृहिणी आहे, यापूर्वीही तिने आतंरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळवले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *