379 total views
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २६ जानेवारी । मोरवाडी म्हाडा । केंद्रीय श्रमिक शिक्षा बोर्ड भारत सरकार यांच्या कल्याणकारी स्वयंरोजगार प्रशिक्षण दि २४ व २५ जानेवारी कापसे उद्यान मोरवाडी येथे संपन्न झाले यात प्रशिक्षणात रोजगाराच्या संधी. महिला उद्योजकता विकास प्रशिक्षण.महिला कायदे. शासनाच्या अनुदान व कर्ज योजनांची माहिती. महिला सक्षमीकरण व सबलीकरणावर मार्गदर्शन व आरोग्य विषयक माहिती देण्यात आली.
# महिलांनी व्यासपिठावर बोलणे
# आरोग्याविषयीची माहिती
# कौटूंबिक हिंसचार कायदे
# अंधश्रध्दा विषयीमाहिती
# महीला कायदे
# महिला अधिकार
# बचतगट योजना
# अनुदान योजना
असे अनेक विषय हाताळले गेले . मोरवाडी येथील लाल टोपीनगर अजमेरा काॅलनी , म्हाडा कॉलनी, सुखवानी ,W सेक्टर अशा विविध भागातील महिलांनी सहभाग घेतला होता. याप्रसंगी नगरसेविका अनुराधाताई गोरखे, सोनाली ताई हिंगे,कविता ताई खराडे,पल्लवी ताई मरकड,रेणुकाताई साखरे,संध्याताई डोके गाडे सर, झिरपे सर,माडगूळकर सर .आंनदा कुदळे,शंकर लोंढे, विशालभाई जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
जलाल पठाण सर , शिवाजी नगर कोर्ट , शिवनकर सर यांनी मार्गदर्शन केले मुख्य प्रशिक्षक श्री सुधाकर राम फुले यांनी प्रशिक्षण दिले कार्यक्रमाचे आयोजन सौ .रोहिणी प्रसाद रासकर सामाजिक कार्यकर्ता व सौ. रेणुकाताई दिपक भोजने सामाजिक कार्यकर्त्या यांनी केले.