टीम इंडियामध्ये बदलाचे वारे: या 4 मोठ्या खेळाडूंना मिळू शकतो नारळ

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२६ जानेवारी । टी-20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाची कामगिरी काही खास ठरलेली नाही. एकीकडे वर्ल्ड कपमध्ये सेमी फायनल पर्यंतही पोहोचू शकले नाहीत. दुसरीकडे दक्षिण आफ्रिका टीमने पहिल्याच कसोटीत पराभूत केले. वनडे फॉरमॅटमध्ये तर भारताला पूर्णपणे चित करण्यात आले. गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघात चढ उतार होत आहेत. त्यातच भारतीय क्रिकेट बोर्डासोबत विराट कोहलीचा वादही उफाळून आला. परिणामी विराटने कर्णधारपद सोडले.

या दरम्यान टेस्ट टीममधील सर्वात अनुभवी क्रिकेटर चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे अंडरपरफॉर्मर ठरले. तर वनडे आणि टी-20 मध्ये तर टीमची मिड ऑर्डर फ्लॉपच ठरली. अशात वेस्ट इंडीज आणि श्रीलंकेच्या विरोधात होणाऱ्या मालिकेत टीम इंडिया मोठे फेरबदल करू शकते. ते कसे असतील हे जाणून घेऊ…

टी-20 वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानच्या विरोधात टीम इंडियाचे गोलंदाज फेल ठरले. त्यांनी एकही बळी घेतला नाही. मोहंमद शमी, जसप्रीत बुमराह इत्यादी बॉलर्सचे चेंडू बाबर आझम आणि मोहंमद रिझवान आरामात खेळत होते. पाकिस्तानने हा सामना तब्बल 10 गडी राखून जिंकला होता. जसप्रीत बुमराह पांढऱ्या चेंडूच्या खेळात आपली वेगळी छाप सोडू शकला नाही. पाकिस्तानच्या विरोधात टी-20 वर्ल्ड कपमध्ये असो की न्यूझीलंडच्या विरोधात झालेल्या सामन्यात दोन्ही ठिकाणी बुमराह यॉर्कर टाकू शकला नाही. त्याच्या बॉलिंगमध्ये ती नेहमीची धार दिसली नाही.

तर शमीची गत सुद्धा अशीच झाली. यानंतर टीम इंडियाने न्यूझीलंडच्या विरोधात टी-20 मालिका खेळली. यामध्ये बुमराह आणि शमी दोघेही नव्हते. त्यांच्या जागी मोहंमद सिराज आणि दीपक चाहर यांना संधी देण्यात आली. त्यामुळे, वेस्ट इंडीज आणि श्रीलंकाविरुद्धच्या सामन्यांत सिराज आणि चाहरला पुन्हा संधी मिळू शकते.

बॉलिंग तर सुद्धा टीम इंडियाच्या बॅट्समेनने सुद्धा चांगली कामगिरी केलेली नाही. टी-20 विश्वचषकात सुरुवातीच्या दोन सामन्यांमध्ये ओपनिंग बॅट्समन रोहित शर्मा आउट झाला. त्यानंतर टीम इंडिया स्कोअर वाढवू शकली नाही. आगामी सिरीझमध्ये मिडल ऑर्डरमध्ये सुद्धा मोठे बदल पाहायला मिळू शकतात. ईशान किशन आणि सूर्य कुमार यादवसारखे खेळाडू खेळताना दिसू शकतात.

गेल्या काही दिवसांपासून वनडे टीमची मिड ऑर्डर सपशेल फेल ठरली आहे. रोहित शर्मा परतल्यानंतर केएल राहुल सुद्धा मिड ऑर्डरमध्ये खेळताना दिसू शकतो. तर सूर्यकुमार यादव पाचव्या क्रमांकावर खेळू शकतो. शार्दूल ठाकूर आणि दीपक चाहर यांची फलंदाजी टीम इंडियासाठी सकारात्मक ठरली आहे. अशात आगामी मालिकेच्या पार्श्वभूमीवर हे दोन खेळाडू ऑलराउंडरचा एक पर्याय ठरू शकतात.

टीम इंडिया अशी आपल्यापेक्षा अतिशय कमकुंवत अशा टीमकडून पराभूत झाली आहे. पण, त्या टीममध्ये काही बदल घडले आहेत. हा पराभव भारतीय संघाला टोचणारा आहे. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे दुसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये चमकले होते. पण, त्याव्यतिरिक्त काहीच करू शकले नाहीत. दोघेही मिळून 6 इनिंग्समध्ये 200 धावा सुद्धा काढू शकले नाहीत. त्यांच्या करिअरला उतरती कळा लागली आहे. अशात हनुमा विहारी, श्रेयस अय्यर यासारख्या खेळाडूंना येत्या काळात संधी मिळू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *