मोठी घोषणा; वीज बिल आणि मीटर रीडिंगसंदर्भात उर्जामंत्र्यांनी केली

Spread the love

महाराष्ट्र २४ – नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून अनेक मोठे निर्णय घेण्यात येत आहेत. राज्यभरात उद्यापासून कलम 144 लागू करण्यात येत आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यानंतर परिवहन अनिल परब यांनी एसटी बसची सेवा 31 मार्चपर्यंत बंद करण्यात येत असल्याची माहिती दिली. आता उर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज बिलांसदर्भात मोठी घोषणा केली आहे.

’23 मार्च पासून ग्राहकांचे मीटर रीडिंग घेऊ नये आणि बिल देऊ नये. सगळे वीज बिल अॅव्हरेज देण्यात येईल. बिल भरले नसेल तरीही वीज पुरवठा खंडित करू नये. वीज कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचाऱ्यांनी वीज चोरी तक्रारीसाठी किंवा बिल तक्रार असल्यास ग्राहकांकडे जाऊ नये,’ अशा सूचना उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *