तर मला कधीही कळवा; निलेश राणेंचे आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि उद्धव ठाकरेंना आवाहन

Spread the love

महाराष्ट्र २४- ऑनलाईन – मुंबई ; चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसचा फटका महाराष्ट्रालाही बसला आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या शनिवारी 52 वरून 64 वर गेली असून, मुंबई 11 नवीन रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या प्रदुर्भावला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्व स्तरावर उपाययोजना करण्यात येत आहे. यावर कोरोनाबाधित रुग्णांसाठी लागणारी जागा अपुरी पडत असेल तर मला कधीही कळवा असं आवाहन भाजपाचे नेते निलेश राणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना केले आहे.

https://twitter.com/meNeeleshNRane?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1241304006871248896&ref_url=https%3A%2F%2Fwww.lokmat.com%2Fmumbai%2Fcoronavirus-bjp-leader-nilesh-rane-has-told-cm-uddhav-thackeray-if-ever-there-insufficient-space%2F

निलेश राणे ट्विट करत म्हणाले की, कोरोनाबाधित रुग्णांसाठी अपुरी जागा पडत असेल किंवा आयसोलेशन विभाग व इतर कोणत्याही वैद्यकीय मदतीसाठी जागेची गरज असल्यास अंधेरीमधील सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे सिंधुदुर्ग भवनमधील जागा आम्ही देण्यास तयार आहोत, त्यासाठी मला कधीही कळवा असं निलेश राणे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *