Jio Vs Airtel Vs VI : हे आहेत 84 दिवसांचे सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२७ जानेवारी । Jio Vs Airtel Vs VI Prepaid Plans : कमी व्हॅलिडिटीचे रिचार्ज काही जणांसाठी त्रासदायक ठरु शकतात, प्रत्येकाला कमी किंमतीत जास्त दिवस चालणारा रिचार्ज प्लॅन हवा असतो, त्यामध्ये 84 दिवसांचा रिचार्ज प्लॅन हा बेस्ट मानला जातो. यामध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, हे वार्षिक प्लॅनप्रमाणे तुमच्या खिशावर भार टाकत नाहीत. तसेच, या प्लॅनमध्ये चांगली व्हॅलिडिटी देखील मिळते. Jio, Airtel, BSNL आणि Vodafone-Idea च्या अशाच रिचार्ज प्लॅनबद्दल जाणून घेऊ या, ज्यांची वैधता 84 दिवस आहे. या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, मेसेजिंग आणि मोफत एसएमएस देखील उपलब्ध आहेत.

जिओ (jio) चा 385 रुपयांचा प्लॅन

रिलायन्स जिओचा 385 रुपयांचा प्लॅन 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये संपूर्ण कालावधीसाठी 6 GB कमाल डेटा उपलब्ध आहे. यासोबतच अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधाही उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये 1,000 आउटगोइंग मेसेज दिले आहेत. डेटा मर्यादा संपल्यानंतर, गती 64Kbps पर्यंत कमी होते. या प्लॅनमध्ये Jio TV, Jio Cinema, Jio Cloud आणि Jio Security सारख्या Jio अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे.

एअरटेल (Airtel) चा 455 रुपयांचा प्लॅन

भारती एअरटेलच्या 455 रुपयांच्या प्लॅनमध्ये 84 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. जिओच्या या प्लॅनमध्ये 6 GB हाय-स्पीड डेटा इंटरनेट देण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग सुविधा उपलब्ध आहे. हा प्लॅन 900 मोफत आउटगोइंग एसएमएससह येतो. डेटा मर्यादा संपल्यानंतर, वापरकर्त्याकडून प्रति एमबी 50 पैसे आकारले जातील. या प्लॅनमध्ये एक महिना मोफत Amazon Prime Video मोबाइल सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. तसेच, विंक म्युझिकची फ्री सदस्यता मिळते.

jio cheapest plan under 500 rupees plan with daily 1 5 gb data check list जिओ सर्वात स्वस्त डेटा प्लॅन: रिलायन्स जिओकडून ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत अनेक प्लॅन दिले जातात.

airtel vs vodafone idea daily 2gb data prepaid plans of 359 rupees with 28 days validity know which is best Airtel आणि Vi (Vodafone Idea) आज आपण असा प्लॅन पाहणार आहोत जो सारख्याच वैधतेसाठी दररोज 2 GB पर्यंत डेटा ऑफर करतो पण त्यांच्या इतर बेनिफिट्समध्ये खूप फरक आहे

affordable best jio vs airtel vs vi recharge plans unlimited calling and data benefits check details Jio, Airtel आणि Vodafone Idea या तिन्ही कंपन्यांचे प्री-पेड प्लॅन डिसेंबर 2021 पासून महाग झाले आहेत

bsnl postpaid plans offers connection for 4 sim at one time check price and benefits सरकारी दूरसंचार कंपनी BSNL खाजगी कंपन्यांना केवळ प्रीपेड प्लॅन्समध्येच नव्हे तर पोस्टपेड प्लॅन साठी देखील चांगली स्पर्धा देत आहे.

airtel 3 best prepaid plans offers upto 3gb daily data and other benefits check details अरटेल कंपनी दररोज डेटा बेनिफिट्ससह अनेक प्रीपेड रिचार्ज प्लॅन देत आहे

Jio 499 rupees recharge plan with daily 2gb data calling and 1 year disney hotstar mobile नेक दूरसंचार कंपन्या त्यांच्या कमी वैधतेच्या रिचार्ज प्लॅनमध्ये देखील एक वर्षापर्यंत मोफत OTT सबस्क्रिप्शन देतात

airtel and vi best postpaid plan for first time users all family members check benefits जर तुम्ही प्रीपेड प्लॅनवरून पोस्टपेडवर शिफ्ट होण्याचा विचार करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी उपयोगी ठरु शकते.

 

Vodafone-Idea चा 459 रुपयांचा प्लॅन

Vodafone-Idea चा 459 रुपयांचा प्लॅन 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये 6 GB डेटा पॅक देण्यात आला आहे. तसेच अमर्यादित व्हॉईस कॉलिंग, 1000SM सुविधा उपलब्ध आहे. डेटा मर्यादा संपल्यानंतर, स्पीड 64Kbps पर्यंत घसरते.

बीएसएनएल (BSNL) चा 429 रुपयांचा प्लॅन

बीएसएनएलचा 429 रुपयांचा प्लॅन 81 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये दररोज 1 GB डेटा दिला जातो. म्हणजे एकूण 91GB डेटा मिळेल. याशिवाय, फोन अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, दररोज 100 एसएमएस ऑफर करतो. डेटा मर्यादा संपल्यानंतर, इंटरनेट स्पीड 40Kbps पर्यंत खाली येईल. BSNL च्या 429 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये मोफत EROS NOW सेवेचा आनंद घेता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *