महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२९ जानेवारी । कोरोना काळातही लोक सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यात पुढे येत आहेत. गेल्यावर्षी या काळात सोन्याची जागतिक स्तरावर मागणी ५० टक्क्यांनी वाढली असून, ती ४ हजार २१ टनांपर्यंत पोहोचली आहे. जागतिक सुवर्ण परिषदेच्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. भारतातही सोन्याची मागणी वाढली असून ती ७९७.३ टनांवर पोहोचली आहे.
कोरोना महामारीमुळे २०२० मध्ये सोन्याच्या मागणीत घट झाली होती. ती ३,६५८.८ टन होती. अहवालानुसार, २०२० मध्ये एकूण सोन्याची मागणी ३,६५८.८ टन होती. त्यानंतर काही प्रमाणात परिस्थिती पूर्वपदावर आल्याने सोन्याच्या मागणीत वाढ झाली, असे गोल्ड डिमांड ट्रेंड्स २०२१ अहवालात म्हटले आहे. मौल्यवान धातूच्या मागणीत वाढ हे मुख्यत: २०२१ मध्ये मध्यवर्ती बँकांनी केलेल्या खरेदीमुळे दिसून येत आहे. प्रामुख्याने भारत आणि चीनमध्ये दागिन्यांची खरेदी मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे. तिमाहीत सोन्याची मागणी वाढून १,१४६.८ टन झाली, जी २०१९ च्या दुसऱ्या तिमाही नंतर सर्वाधिक आहे. ही मागणी मागील आर्थिक वर्षातील याच कालावधीतील मागणीपेक्षा ५० टक्क्यांनी जास्त आहे.
# ग्राहकांकडून मागणीत वाढ झाल्यामुळे २०२१ मध्ये भारतातील सोन्याची मागणी ७९७.३ टनांवर पोहोचली आहे.
# सोन्याची मागणी २०२१ मध्ये ७६.६ टक्क्यांनी वाढून ७९७.३ टन झाली आहे. २०२० मध्ये सोन्याची मागणी ४४६.४ टन होती.
# कोरोना किंवा इतक कोणतेही भीषण संकट न आल्यास सोन्याची मागणी ८०० ते ८५० टन राहण्याची शक्यता आहे.
# तर दागिन्यांची मागणी ९६ टक्क्यांनी वाढून २,६१,१४० कोटी रुपये झाली आहे. २०२० मध्ये ती १,३३,२६० कोटी रुपये होती.
२०२१ च्या शेवटच्या तिमाहीत सोन्याच्या विटा आणि नाण्यांची मागणी १,१८० टन होती, जी गेल्या आठ वर्षांतील सर्वाधिक आहे. हवालात म्हटले आहे की, सलग १२व्या वर्षी केंद्रीय बँकांनी सोन्याची खरेदी केली. त्यांनी ४६३ टन सोने खरेदी केले, जे २०२० च्या तुलनेत ८२ टक्के जास्त आहे.