देशातील १५ जिल्हे तर महाराष्ट्रातील २ जिल्ह्यांचा समावेश रेड झोन मध्ये

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२९ जानेवारी । देशात अजूनही कोरोना संकटाचे गडद सावट दिसत आहे. दररोज देशाभरात दोन लाखांपेक्षा अधिक नव्या कोरोना रुग्णांची भर पडताना दिसत आहे. शुक्रवारी (२९) देशात 2,51,209 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 627 लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमावावा लागला आहे. (Covid -19) सध्या देशात कोरोना संक्रमणाचा दर 15.88 टक्के असून केंद्रीय मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार मागच्या सात दिवसांमध्ये देशातील 15 जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण वाढीचा वेग मोठा आहे. या 15 जिल्ह्यांमध्ये सात जिल्हे हे दक्षिण भारतातील आहेत. महाराष्ट्रातील (Maharashtra) दोन जिल्ह्यात रुग्ण वाढीचा वेग अधिक असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे राज्यात अजूनही कोरोनाचे भय दिसत आहे. (Corona In India)

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, केरळ (keral) राज्यातील काही जिल्ह्यांत सर्वाधिक कोरोना रुग्ण वाढीचा वेग आहे. राज्याच्या सहा जिल्ह्यांत कोरोना रुग्णांती संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याचबरोबर गुजरात, महाराष्ट्र आणि तामिळनाडू या राज्यातील प्रत्येकी दोन जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. तर कर्नाटक (Karnataka) आणि राजस्थानमधील प्रत्येकी एका जिल्ह्यांत कोरोना रुग्ण वेगाने वाढत असल्याची माहिती समोर आली आहे.

21 ते 27 जानेवारी यादरम्यान 15 जिल्ह्यातील रुग्णसंख्या

बंगळुरू शहर – 1,43,960

पुणे -75,592

एर्नाकुलम – 55,693

तपुरम – 46,570

अहमदाबाद – 44,666

चेन्नई – 30,218

नागपूर – 28,326

कोझीकोड – 27,229

थिरिसूर – 25,822

कोयंबटूर – 25,751

कोल्लम – 23,191

वडोदरा – 22,021

कोट्टायम – 20,730

गुरुग्राम – 19,727

जयपूर – 19,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *