महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २९ जानेवारी । जवळपास १४ वर्षे प्रेक्षकांचे छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय असणारी मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ ही मालिका मनोरंजन करताना दिसत आहे. टीआरपीमध्ये देखील ही मालिका टॉपला असल्याचे पाहायला मिळते. दरम्यान या मालिकेत काम करणारे अनेक कलाकार बदलले आहेत. सोशल मीडियावर आता जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी मालिका सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
सध्या सोशल मीडियावर या मालिकेसंबंधित एक पोस्ट व्हायरल होत आहे. निर्माते असित मोदी यांनी जेठालालच्या भूमिकेत सोशल मीडिया कंटेन्ट क्रिएटर सौरभ घाडगेला घेतल्याचे या पोस्टमध्ये म्हटले आहे. सौरभ जेठालालच्या भूमिकेत दिसणार असल्याचे पोस्टमध्ये सांगितले आहे. त्यासोबतच मालिकेचे पोस्टर आणि बाजूला सौरभचा फोटो लावण्यात आला आहे. या फोटोवर लिहिण्यात आले आहे की जेठालालच्या जागी सौरभला घेण्याचा विचार तारक मेहताचे निर्माते करत आहेत.
https://www.instagram.com/the_sensible_times/?utm_source=ig_embed&ig_rid=e8a91ff7-39be-4b8b-9e5f-1310df189e00
सोशल मीडियावर सध्या ही पोस्ट चर्चेत आहे. सौरभने ही पोस्ट पाहून या सर्व अफवा असल्याचे म्हटले आहे. मजा-मस्ती करण्यासाठी ही पोस्ट तयार करण्यात आल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. छोट्या पडद्यावरील सर्वाधिक काळ चाललेली ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका आहे. या मालिकेत दिलीप जोशी यांच्यासोबतच अमित भट्ट, शैलेश लोढा, मुनमुन दत्ता आणि इतर काही कलाकार दिसत आहेत.