महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २९ जानेवारी । एक हजार स्क्वेअर फूट असलेल्या किराणामाल दुकानात वाईन विक्रीची जी परवानगी सरकारने दिली आहे. सरकारने घेतलेल्या हया निर्णयावर जो काही विरोध होत आहे.तो योग्यच आहे.परंतू मला अस वाटतय कि असा विरोध ज्या वेळी गावोगावी चौकाचौकात “बिअर शाॅपी” टाकायला परवानगी दिली त्या वेळेस व्हायला पाहीजे होता. बिअर शाॅपी च्या दुकानात बिअर बरोबर वाईन भेटतेच की बर बिअर शाॅपी ची परवानगीच्या अटी फारच जाचक आहेत असही नाही. त्या अटी सहजपने कोणीही पुर्ण करू शकतो .आताच्या निर्णयाने चौकाचौकात पोहोचलेली वाईन घरोघर पोहचली आहे. दारू पिणारा वाईन कधीच पिणार नाही कारण की वाईन दारु पेक्षा खूपच महाग आहे. शिवाय वाईन मध्ये अल्कोहोल चे प्रमाण दारूच्या तुलनेने कितीतरी पटीने कमी असते. रेड वाईन तर तब्बेतला गुणकारी असते असे बाहेरील देशांचा अनुभव सांगतो.
असो, हे सर्व न पटण्यासारखे आहे. परंतू विरोध करणाऱ्यांनी वाईन व दारूतला फरक समजून घेही महत्वाचे आहे. म्हणून हा उहापोह मि करत आहे. वाईन ची चव अतीशय बेचव असते म्हणून अटटल दारू पिणारे वाईन कडे बघतही नसतील . एखाद्या बार वर तपासणी केली तर लक्षात येईल की शंभरात दोन तीन किंवा चार या पेक्षा वाईन पिणारा सापडणार नाही. देशात अंदाजे फक्त तिन चार टक्के च लोक वाईन पित असतील. त्या मुळे एकंदरीत ह्या निर्णयाने समाजावर खुपच वाईट परिणाम होईल असे वाटत नाही. थोडक्यात दारुड्यां मध्ये आहे त्या परिस्थितीत खूपच बदल घडेल वाढ होईल असे तरी सध्या वाटत नाही. किंवा सरकारलाही हया निर्णयामुळे खूपच महसूल वाढून मिळेल असेही निश्चिती दिसत नाही. पि.के.महाजन.