मुंबई- पुणे महामार्गावर भीषण अपघात; कार – कंटेनरची धडक; पाच जणांचा जागीच मृत्यू

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३० जानेवारी । जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर कार्ला फाट्याजवळील शिलाटणे गावच्या हद्दीत कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की गाडीचा चक्काचूर झाला आहे. (Pune Accident)

रविवारी सकाळी ७.३०च्या सुमारास हा अपघात घडला आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोणावळ्याहून पुण्याकडे भरधाव वेगात जाणाऱ्या इको कारच्या चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात जाणारी कार दोन्ही मार्गामधील दुभाजक ओलांडून ती पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या एका कंटेनरला जोरात धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, कार कंटेनर खाली घुसल्याने कारचा अक्षरशः चुराडा झाल्याने कारमधील पाचही प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे.

अपघाताची माहिती मिळताच लोणावळा उपविभागीय पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील, लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन बनकर व त्यांच्या सहकाऱ्यांसह, देवदूत आपत्कालीन पथक, आयआरबीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी देवदूत आपत्कालीन पथक व आयआरबीच्या पथकाच्या मदतीने अपघातग्रस्त कारला बाहेर काढून, कारमधील पाचही प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर दोन्ही अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला करून मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीत केली. या घटनेचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *